मध्यप्रांत-वऱ्हाड हिंदु परिषद ४७५
संघटनाला नडणारी सर्व जातिबंधनें
झुगारून दिलीं पाहिजेत. या जातिभेदामुळे संघटन अशक्य झालें असून, कनिष्ठ जातींच्या मनात आपल्या हीन स्थितीचें वैषम्य सतत डाचत आहे. हिंदु समाजांतील कांहीं जातींत आजहि संकर (fusion) होणें शक्य आहे. पण, कांही जातींतील आचारादि भिन्नता इतकी विलक्षण आहे कीं, आजच त्यांचा संकर होणें शक्य नाहीं. सर्व जातींच्या संमिश्रणाचा व संघटनाचा हा प्रश्न जरी बिकट असला, तरी हिंदु सभेने तो हळुहळू सोडविला पाहिजे. देशपरत्वें व जातिपरत्वे निरनिराळ्या उपायांचा अवलंब करावा लागेल. पण, हें कार्य यशस्वी करणें आंजहि शक्य आहे. मी स्वतः या बाबतींत आत्यंतिक मर्यादेपर्यंत जावयाला तयार आहे. सद्यःस्थितींत जाति बंधनांचे समर्थन करणें सर्वथैव अशक्य आहे. चार वर्णाच्या लोकांपैकी कोणताच वर्ण स्वतःच्या कर्तव्याचे पालन करीत नाहीं.
सर्वच वर्ण कर्तव्यच्युत झाले आहेत
अशा स्थितींत आपापल्या वांट्याला येणारी कर्तव्य मुळींच न करितां, श्रेष्ठतेच्या हक्कांचा एवढा अभिमान कां धरतां ? ब्राह्मणांचे वर्णगुरुत्व मानावयाला ब्राह्मणेतर ` आतां मुळींच तयार नाहींत. कनिष्ठ जाति यापुढें हीन दर्जा पत्करावयाला कबूल नाहींत. तुकस्तान हें हिंदु राष्ट्रांपेक्षा सुद्धा अधिक पुराणमतवादी राष्ट्र आहे. पण तुर्कस्थानांतील मुसलमानांनी प्रगतीच्या आड येणारी सर्व
धार्मिक बंधनें झुगारून दिली !
धर्म ही संस्था समाजाच्या उन्नतीसाठी आहे. अर्थांत, समाजोन्नतीला अपकारक अशीं जीं धार्मिक बंधने असतील, तीं परिस्थितीला अननुरुप आहेत असें समजून, त्यांचा बेलाशक त्याग केला पाहिजे. वरिष्ठ जातींनी आपल्या श्रेष्ठपणाचें स्तोम माजविल्याने संघटनेच्या कार्यांत अडथळे मात्र उत्पन्न होतील.
शुद्धि
हिंदू धर्माने नाना प्रकारचें भेद निर्माण करून हिंदु समाजांत अनेक तट पाडले आहेत. सद्यःस्थितींत, हे जातिभेद पाळणें सर्वथैव अपायकारक आहे. पण, हीं जातिबंधने न पाळल्यास आज ग्रामण्य घातलें जाते ! उदाहरणार्थ, हलक्या जातींच्या वापरीत असलेल्या विहिरीचे पाणी प्याल्यामुळें, जात बाटून पुष्कळ लोक परधर्मांत गेले आहेत. तसेंच कांही लोकांचे धर्मातर निव्वळ जुलमानें झालें आहे. अशा लोकांना पुन्हा स्वधर्मात घेणें अगदीं न्याय्य आहे.
ज्या स्त्रियांवर बलात्कार केले जातात अशा स्त्रियांना हिंदुसमाज जातिबाहेर टाकतो. अशा