४७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
स्त्रिया नाईलाजाने वेश्या होतात.
किंवा धर्मांतर तरी करितात. इतकेंच नव्हे तर, त्यांच्या gÀ रक्षण करावयाला असमर्थ असलेल्या हिंदुपेक्षां बलिष्ठ मुसलमानांचाच आश्रय करणें त्यांना इष्ट वाटतें ! दुर्देवाच्या तडाख्यांत सांपडलेल्या अशा हतभागी स्त्रियांना जर पुन्हां आपल्या कुटुंबात घ्यावयाला त्यांचा पति किंवा पिता तयार नसेल तर त्या दुर्देवी अबलानी खुशाल मुसलमानांच्या हात धरावा ! स्वतःच्या स्त्रियांचे रक्षण करावयाला असमर्थ असलेला असला हा अनुदार
हिंदुधर्म नष्ट झालेला पुरवला !
आणि असला हिंदुसमाज स्वराज्यालाहि सर्वथैव अपात्र आहे. शुद्धीला जे विरोध करितात, त्यांना हिंदु समाजाच्या प्राचीन इतिहासाचें मुळींच ज्ञान नाहीं. बौद्ध धर्मांचा एका काळीं सर्व ARAM स्वीकार केला होता. पुढें त्या सर्व बौद्धधर्मीयांना हिंदू करण्यांत आलें. दक्षिण हिंदुस्थानांत हजारों लोक खिस्ती झालेले होते. आणि ख्रिस्ती व हिंदु या दोनहि समाजांत
सर्रास बेटीव्यवहार होत असे
इतकेंच नव्हें, तर खिस्ती मुलगी आपल्या हिंदु नवऱयाचें मन खिस्ती धर्माचा स्वीकार करावयाला वळवील अशा समजुतीने खिस्ती धर्मगुरू मिश्र विवाहांना उत्तेजन देत. हे सर्व खिस्ती लोक हिंदु करून घेण्यांत आले. माझ्या एका इंग्रजी मित्राने मला अशी सूचना केली कीं, मुसलमानांना क्षत्रिय समजून,
fel मुसलमानांना आत्मसात केलें
तर हा बिकट प्रश्न सहज सुटेल. हिंदु धर्माची इतकी प्रगति भिन्न संस्कृतीच्या लोकांना आत्मसात केल्यानेच झाली आहे. अर्थात शुद्धीची चळवळ सर्वथैव निरपवाद आहे.
समतेच्या तत्त्वावर ऐक्याची उभारणी
हिंदु व मुसलमान यांचा सलोखा नुसत्या जाहीरनाम्यांनी होणार नाही, कृतीने, परस्परसहानुभूतीनें, परस्पर विश्वासानेंच होईल. ऐक्याची तळमळ दोनहि समाजांत तीव्रतेनें उत्पन्न झाल्याविना, समेट होणें अशक्य आहे. समतेच्या तत्त्वावर ऐक्य व्हावें, अशी इच्छा आज दिसत नाही. विषमता पतकरून मुसलमानांशी समेट करणें, म्हणजे दैन्याला आणि दुर्दशेला आमंत्रण देणेंच होय !”
बहिष्कृत भारत : ता. २ सप्टेंबर, १९२७.