ब्राह्मणेतर पक्ष - Page 524

४७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

५० रुपये असे लहानमोठे पगार मिळू लागले. कोणी तर प्रत्यक्ष नोकन्याच पटकावल्या. चळवळ राहिली चळवळीच्या ठिकाणी आणि हे आपल्या स्वार्थाच्या भजनी ! फुरसदीची चार-दोन व्याख्याने झोडायला मात्र केव्हाही ना नाही. आता तर काय ? उघडउघड सरकारी नोकऱ्या हेच ध्येय ठरले आहे. या ध्येयाच्या प्राप्तीसाठी मराठे पुढारी आज ब्राह्मणांविरूद्ध तर आदळआपट करीतच आहेत, पण खुद्द ब्राह्मणेतरांतीलच पुढारलेल्या अनेक जातींच्या नावाने खडे फोडून ' ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे फक्त मराठा जातीची चळवळ ' असे नवीन भाष्य प्रचलित करीत आहेत. या साध्यासाठी ब्राह्मणेतर चळवळीच्या मूळ ध्येयाचे वाटोळे झाले तरी त्यांना आता पर्वा नाही. ब्राह्मणांना ज्या दुष्कर्मासाठी ते दोष देत आहेत त्याच दुष्कर्मात ते आता या चळवळीचा बळी देत आहेत. “

' ब्राह्मणेतर पक्षाची संघटना '

मुंबई इलाख्यातील ब्राह्मणेतर पक्षात मराठा-मराठेतर वाद माजून राहिला आहे. वादाचा परिणाम म्हणजे ब्राह्मणेतर पक्षात दुही माजून ब्राह्मणेतर चळवळ विस्कळीत होणार. असे होऊ नये म्हणून गेल्या महिन्यात श्री. राजाराम महाराज, कोल्हापूर ह्यांच्या मुंबई येथील राजवाड्यात ब्राह्मणेतर पुढाऱ्यांची सभा भरली होती. सभेत एकंदर परिस्थितीचा विचार करण्यासाठी व मराठा-मराठेतर वाद मिटविण्याचा उपाय सुचविण्यासाठी खालील सद्गृहस्थांची एक कमिटी नेमण्यात आली आहे. जूनअखेर हया कमिटीने आपला रिपोर्ट तयार करावयाचा आहे. 'कनिटीतील सद्गृहस्थांची नावे सर रघुनाथराव सबनीस, डॉ. आंबेडकर, श्री. आचरेकर, रा. ब. बोले, श्री. आसवले. ' (ब. भा. २९-३-१९२९).

असले अनेक प्रयत्न होऊनही ब्राह्मणेतर पक्षात एकी व संघटना होऊ शकली नाही. याची अनेक कारणे होती. “

१९१९ ते १९२९ च्या काळात महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर पक्षाबद्दल लोकप्रियतेची लाट उसळली व ओसरली. १९३० च्या एप्रिलमध्ये गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. त्या सत्याग्रहातून इतर सत्याग्रहांचा सर्व देशात असा काही वणवा पेटला की, त्यात सरकार व इतर राजकीय पक्ष बेचिराख होण्याच्या पंथाला लागले. ब्राह्मणेतर पक्षातील तरुण कार्यकर्ते व पुढारी काँग्रेसला मिळताच बहुजन समाज काँग्रेसला मिळाला आणि ब्राह्मणेतर पक्ष उपेक्षित अवस्थेत दिवस

Pa लागला. या पक्षात जोम उत्पन्न करण्याचे अनेकांनी अनेक प्रयत्न पुढील

काळात केले. त्या प्रयत्नांपैकी मराठा लीगची स्थापना हा एक होय. नाव वेगळे, पण पक्ष तोच. पण याही प्रयत्नाला यश आले नाही. “2

१; खैरमोडे, खंड, ५ वा, पृ. २७६, २७७, ३०२, ३०४ आणि ३०७.