४८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
४. महारांची नोकरीचीं कामें कोणती याविषयीं निश्चितपणा नसल्याकारणाने त्यांच्यावर सरकारी दुय्यम अधिकाऱ्यांकडून जो अनन्वित जुलूम करण्यांत येतो ; त्याचा बंदोबस्त व्हावा. या उद्देशानें या परिषदेची सरकारला अशी विनंती आहे कीं, वतनदार कामदारासंबंधाच्या कायद्याच्या ६९ व ८३ कलमांमध्ये दुरुस्ती करून महारांच्या नोकरीचीं कामें शक्य तितक्या लवकर निश्चित करावीं.
५. कित्येक ठिकाणीं, पूर्वजांनी वतनी जमिनी विकून टाकल्यामुळे व त्या परत मिळविण्याची मुदत टळून गेल्याकारणानें, महारांना मुशाहिऱ्यांच्या मोबदल्याखेरीज आपलीं कामें करावी लागतात. परंतु वतनदार कामदारांसंबंधाच्या कायद्याच्या wad दुसऱ्यांच्या हातीं गेलेल्या वतनदारांच्या जमिनी परत मिळविण्याचा जो अधिकार कलेक्टरला दिलेला आहे त्याला मुदतीची हरकत येऊ शकत नाही. तरी, कलेक्टरांनीं या अधिकाराचा उपयोग करून महारांना त्यांच्या जमिनी परत देववाव्या अशाविषयीं सरकारनें कलेक्टरांना सर्क्युलरें त्वरित पाठवावी, अशी या परिषदेची विनंति आहे. |
६. गांवांत स्वच्छता ठेवणें हें महारांचे एक काम आहे असें ता. २८ जून १८८८ च्या नं. ४२७३ च्या सरकारी ठरावानें ठरविण्यांत आलें. परंतु वतनदार कामदारासंबंधाच्या कायद्याच्या चौथ्या कलमाशीं हा ठराव विसंगत आहे, तरी तो सरकारनें ताबडतोब रद्द करावा, अशी या परिषदेची आग्रहपुरःसर सूचना आहे.
७. महारांचा बलुत्याचा जो हकक आहे तो गावांतील लोकांची खाजगी कामें ठरण्याचा मोबदला म्हणून आहे असें गृहीत धरण्याला कांही आधार नाही असें ता. ३ मे १८९९ च्या नं. ३०७४ च्या सरकारी ठरावामध्ये म्हटले आहे. महारांना त्यांच्या वतनाच्या मोबदल्यास लोकांची खाजगी कामें करावयास सांगण्याला कायद्याचा कांही आधार नाही, हें वतनदार कामदारांसंबंधाच्या कायद्याच्या चौथ्या कलमावरून व सदरील ठरावावरून स्पष्ट होते. तरी महारांना रयतेच्या खाजगी कामाच्या जबाबदारींतून मुक्त करणें अवश्य आहे. असें या परिषदेंचे मत आहे.
SS EPID NNN EO IN UU VIO NN बहिष्कृत भारत : ता. २ सप्टेंबर, १९२७.
डब्ल्यू-२०७३-३१ ब