वतन कायद्याच्या दुरुस्तीचे बिल - Page 530

परिशिष्ट-२९
वतन कायद्याच्या दुरुस्तीचे बिल

महार वतनाच्या दृष्टीनें वतन कायद्यांत अवश्य असलेल्या सुधारणांची

डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेली योजना

१८७४ सालीं वंशपरंपरेच्या हुद्यासंबंधाचा कायदा (The Bombay Hereditary offices Act, 1874) पसार करण्यात आला. ह्याला ' सन १८७४ चा मुंबईचा अँक्ट ३: रा ' (The Bombay Act No. NI of 1874) असे म्हणतात. साधारण लोकांमध्ये ' वतनाचा कायदा ' या नावाने हा कायदा प्रसिद्ध आहे. या कायद्यामध्ये शेवटची सुधारणा १९२३ साली करण्यांत आली. त्या कायद्यांत महार वतनदारास लागू असणाऱ्या कलमांत आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता आहे. त्याकरितां हा दुरुस्तीचा खर्डा तयार करण्यांत आला असून त्यांतील मुख्य सुधारणेची कलमें पुढील प्रमाणें आहेत :-

(१) १८७४ च्या कायद्यांत कलम ९ रक्‍कम १ मध्ये ' वहिवाटदाराचा मेहनताना म्हणून लावून दिलेलें असेल किंवा नसेल ' असे शब्द आहेत, त्या ठिकाणी पुढील शब्द घालण्यांत यावे :-

““ एखाद्या वंशपरंपरेच्या हुद्यासंबंधाचीं कामें करणाऱ्याबद्दल मेहनताना

देण्याकरितां लावून दिलेलें असेल. [“ ]

(२) सध्याच्या कायद्यांतील ९ कलमानंतर पुढील जादा मजकूर जोडण्यांत आला :-

““ ९अरक्कम१. एकाद्या वंशपरंपरेच्या इद्यासंबंधाचीं कामें करण्याकरिता

वहिवाटदाराचा मेहनताना म्हणून एकादे वतन किंवा त्यांचे कांही उत्पन्न लावून

दिलेलें असेल व तीं कामें करून घेण्याची वहिवाट बंद झालेली नसेल आणि

हा कायदा अमलांत येण्याच्या पूर्वी तसें वतन अगर त्याचा भाग अथवा त्याच्या

उत्पन्नाचा भाग कोणत्याही ब्रिटीश कोर्टाच्या हुकुमाच्या अगर हुकुमनाम्याच्याअन्वयें,

परंतु कलेक्टरच्या संमतीवांचून व रेव्हिन्यू रेकार्डसूमध्यें मालकाचें नांव

बदलल्या खेरीज, त्या वतनाचा वतनदार नसलेल्या एकाद्या माणसाच्या

मालकींत किंवा फायदेदार कबज्यांत गेला असेल तर तो दुमाला रद्द असल्याचें