वतन कायद्याच्या दुरुस्तीचे बिल - Page 532

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ४८६

(४) सध्यांच्या कायद्याचे कलम १५ रक्कम १ ला पुढील पुस्ती जोडण्यांत

यावी :-

“ तथापि, कनिष्ठ धारण करणाऱ्या गांवकी संबंधीच्या या कायद्याच्या ६३ कलमामध्यें अंतर्भूत होणाऱ्या एकाद्या वतनदारानें, आपल्या हुद्यासंबंधीचीं कामें करण्याबद्दल मेहनताना म्हणून त्यांच्या कबजांत वतनजमिनी असल्यास कलेक्टराला लेखी कामें करण्याच्या इच्छा दर्शविल्यास त्याला तशीं कामें करण्याच्या जबाबदारींतून कायमचें मोकळें करण्यात यावें आणि त्यानें तशा जमिनीवरील मामुलजुडी देण्याचें कबूल केल्यास त्या जमिनी आपल्या

HINA ठेवण्याचा त्याला हक्‍क असावा. “

(५) कलम ८३ च्या जागीं खालील कलम घालण्यांत यावें :-

“ ८३. हा कायदा पसार केल्यावर कलम १८ मध्यें निराळ्या प्रकारची तजवीज केली असेल तर तेवढा अपवाद ठेवून, कोणत्या वंशपरंपरागत हुद्यासंबंधीं कोणतीं कामें करावयाची तें निश्चित करणारे नियम सरकारनें तयार करावेत. मात्र अशा रितीनें केलेले नियम आणि त्यांमध्यें मागाहून करण्यांत आलेले फेरफार हे ते कायदेकौन्सिलच्या टेबलावर सभासदांच्या माहितीकरितां व कोणाला काहीं आक्षेप घ्यावयाचा असेल तर तसें करण्यास संघि मिळावी, याकरितां कमींत कमी पंधरा दिवस ठेवल्याशिवाय अमलांत येऊ नयेत. “

७०७

बहिष्कृत भारत : ता. ३० सप्टेंबर १९२७.