शुद्धीकरणाचें ढोंग - Page 535

शुद्धीकरणाचें ढोंग ४८९

सुधारणेच्या काळांत अस्पृश्यवर्ग कबूल करणार नाहीं. हें ब्राह्मणेतर वर्गानीं लक्षात ठेवावें. नागपुरांत नांवानें लौकिकास आलेल्या “ब्राह्मणेतर संघाने” व त्याच्या पुरस्कर्त्यांनीं वेळींच सावध होऊन, ब्राह्मणेतरांतील अशिक्षित व अडाणी लोकांना जागृत करण्यास कर्तव्य बजावतील अशी आशा आहे.

अस्पृश्यता निवारण करण्यास जसा ब्राह्मण समाज तयार आहे, तसा ब्राह्मणेतर नाहीं. त्याचें कारण ब्राह्मणेतरांतील रानटीपणा हेंच होय.

आपला नम्र,

धर्मदास मारुती नगरारे,

इमामवाडा पेठ, नागपूर.

तारीख २७-१०-१९२७.

बहिष्कृत भारत : ता. ४ नोव्हेंबर १९२७.