राष्ट्रवीरावर नोटीस - Page 538

परिशिष्ट-३२

राष्ट्रवीरावर नोटीस

श्रीयुत

संपादक बहिष्कृत भारत यांसी--

क्‌. सा. ना. वि. वि.

राष्ट्रवीर पत्राच्या ता. ३० ऑगस्ट १९२७ च्या अंकांतील 'ब्राह्मण्य ठार मारिलें पाहिजे' व ता. १३ सप्टेंबर १९२७ च्या अंकांतल्या 'हा घ्या पुरावा' या स्फुटामधील “पौरुष्यही हिसकावून घेतलें आहे” हे दोन वाक्यप्रयोग इतःपर उपयोगांत न आणण्याबद्दल बेळगांवचे डि. मॅजिस्ट्रेट मि. माँटिथ यांनीं आम्हांस ताकीद दिली आहे. उपरोक्त दोनही लेखांचे उतारे आपल्या महितीसाठी या लगत ठेविले आहेत. यावरून सदरहू ताकीद कशी अयोग्य व वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, हें आपल्या ध्यानीं येईलच. यास्तव असली अन्याय्य ताकीद मागें घेण्यास सरकारला भाग पाडणें हें आपलें कर्तव्य आहे. तरी हें कर्तव्य बजावून आपण व्यवहारबंधुत्व सांभाळाल, अशी मी आशा करितों. कळावें, लोभ असावा हि विनंती.

बेळगांव शामराव गोविंदराव देसाई

ता. १२-१०-२७ संपादक-राष्ट्रवीर.

बहिष्कृत भारत : ता. ४ नोव्हेंबर १९२७.