राजर्षी छत्रपती शाहू ४९५
शोधून काढला ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एकवेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते. “ १
स्त्रियांना क्रूरपणे वागविले जावू नये म्हणून त्यांनी कायदे केले. त्यातील “ The Kolhapur State Divorce Act of 1919” हा प्रमुख होय. जर अस्पृश्यांना समतेने वागविले नाही तर प्रिन्सिपाल अगर खालच्या दर्जाच्या शिक्षक असो त्याला जाब द्यावा लागेल आणि खाजगी संस्थांना जी मदत मिळते ती काढून घेण्यात येईल असा आदेश ता. २३ आगस्ट १९१९ रोजी जारी केला.
' मानवी जीवनाविषयी अत्यंत सहानुभूती ' हे शाहूंचे ब्रीदवाक्य होते.
' हिंदी राष्ट्राची स्थापना करण्यासाठी ब्राह्मणशाहीचा नायनाट करा ' अशी त्यांची क्रांतिकारी घोषणा होती.
“ शाहूंनी आपल्या दिव्य चक्षूंनी स्वातंत्र्य. समता, बंधुता व बुद्धिप्रामाण्य यांवर अधिष्ठित अशी नवीन प्रकारची समाजरचना भारतात स्थापना केल्या जाईल असे दृश्य पाहिले. कामगारांना अधिकार प्राप्ती झाली पाहिजे, अस्पृश्यतेचे निर्मूलन झाले पाहिजे, सामान्य मनुष्याचा ऐहिक दर्जा वाढला पाहिजे हे त्यांचे तत्त्वज्ञान भारताच्या राज्य घटनेत सामाजिक व आर्थिक लोकशाही स्थापण्याच्या ध्येयात समाविष्ट झालेले आहे. ते घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांशी निगडीत झालेले आहे. “२
महाराजांचे दिनांक ६ मे १९२२ रोजी मुंबईतील पन्हाळा लॉज, खेतवाडी येथे अकाली निधन झाले.
१, खंड १८, भाग-१, पृ. ४.
२: कीर, राजर्षी शाहू छत्रपती, पृ. ४३७, ५३२, ५३४, ५३६.
डब्ल्यू-२०७३-३२ अ