श्रीमन्महाराज छत्रपति साहेब सरकार करवीर यांचे सेवेशी - Page 542

परिशिष्ट-३४

श्रीमन्महाराज छत्रपति साहेब सरकार करवीर यांचे सेवेशी

आज्ञाधारक सेवक समस्त वतनदार महार लोक रा. बस्तवाड, पेटा रायबाग, इ. करवीर यांचा नम्न अर्ज खालीं लिहिलेप्रमाणे :-

आम्हां महारलोकांस हिंदु समाजांतील आचारविचारांनीं, दुष्ट चालीरीतींनी आणि बंधनांनी अस्पृश्य ठरवून टाकलें ; आणि बहिष्कृत करून गांवाबाहेर राहणेस भाग पाडलें, यामुळे आमची सर्वतोपरी अत्यंत हानी झाली आहे. इतर सर्व समाजांत अनेक प्रकारें SAGE होत आहे. त्यांची सुधारणा चालू आहे. परंतु आम्ही मात्र सुधारणेस मुकलों व सुखास पारखे झालों ! आमच्यांत मनुष्यपणासुद्धां राहिला नाहीं. आम्ही अति निकृष्ट स्थितीस पोंचलों.

श्रीमन्महाराज छत्रपतींनी आम्हांस ऊर्जित दशेस आणावें आणि आमची सुधारणा करावी म्हणून अनेक मार्गांनी प्रयत्न चालविले आहेत; आमचेसाठीं

AEN काढलीं ; विद्या मंदिरें खुली केलीं ; कित्येकांना नोकऱ्या दिल्या ; आणि

कांहींचा वकिलीसारख्या उच्च धंद्यांतही प्रवेश करविला आणि स्पृश्यास्पृश्यतेचा भेद बाजूस ठेवून सरकारांनी आम्हांस मुलाप्रमाणे ममतेनें वागविलें ! याबद्दल आमचा समाज हुजूरांस देवाप्रमाणें पूज्य मानीत आहे. आणि या औदार्याबद्दल पिढ्यानुपिढ्या हा समाज हुजूर चरणांचा ऋणी राहील !!

इतकें झालें तरी, आमच्या समाजाचे लोकसंख्येकडे दृष्टी दिली म्हणजे मन निराश होतें । आणि काय करावें, तें सुचत नाही ! झालेली सुधारणा कांहींच नव्हे, असे वाटू लागतें | |

हिंदु समाजांत वतनाची आवड फार. परंतु आमचें वतन व आमची वतनी नोकरी यांत आम्हांस भूषण वाटण्यासारखे कांहींच नाहीं. परंतु अंध परंपरेने नरकांतल्या किड्याप्रमाणें असलेही वतन आम्हांस प्रिय वाटत आहे ! या क्षुद्र वतनी नोकरीतून आम्हांस मुक्त करावें म्हणून हुजुरने एक वट हुकूम काढला आणि ठरविलें कीं १० एकर जमिनी मागे एक महार नोकर सरकारांनी घ्यावा. आणि बाकी सर्व महारांना नोकरीतून कमी करावें. परंतु या हुकमाने इष्ट हेतु साध्य होत नाहीं. कारण हल्लीं इतर सर्व महारांच्या कबज्यातील जमिनी जाणार आणि ते असंतुष्ट होणार. दुसरें सर्व जमिनी थोड्याशा महार लोकांत वाटल्या जाऊन

डब्ल्यू-२०७३-३२ ब