श्रीमन्महाराज छत्रपति साहेब सरकार करवीर यांचे सेवेशी - Page 543

श्रीमन्महाराज ` ` ` ` ` ` ` - यांचे सेवेशी ४९७

पुन्हां वतनी नोकरीचें जूं त्यांचे मागे राहणारच ! या क्षुद्र वतनी नोकरीचें लोढणें आमच्या गळ्यांत असेपर्यंत आमची दशा सुधारणे शक्य नाहीं. करितां ही वतनी नोकरीच अजिबात काढून टाकावी असें आमचें म्हणणे आहे.

सरकारांस आमची नम्र सूचना खालीं लिहिलेप्रमाणे :-

आजवर जमिनी ज्याजकडे जशा चालत आल्या आहेत ; तशाच त्याजकडे चालू

ठेवाव्यात. कबजाची दिगरादिगर अगर फेरफार करूं नये. फक्त सर्व महारकी वतन ९ नंबराचे इनामपत्रकांतून काढून नमुना नंबर ५ च्या रयताव्यांत दाखल कराव्यात आणि दुसरी गोष्ट सर्व महार लोकांना वतनी नोकरीतून मुक्त करावें. सरकारची अगर रयतेची कसलीही वतनी नोकरीची जबाबदारी त्यांचेवर ठेवू नये.

या योगानें आम्हांस कांहींशी स्वतंत्रता मिळेल; इतर धंदे करण्यास चार पैसे मिळून सवडही होईल. यांत कोणाचें नुकसान नाहीं. अर्थातच असंतोषही नाहीं. आमची वतनी नोकरी म्हणजे गांवची वेठ बिगार करणे, लांकडे फोडणें, जनावरांची प्रेत वाहणें, आणि गांवचीं गलिच्छ कामें करणें. हीं कामें वतन कारणाने म्हणून आमचेवर लादली आहेत, तोपर्यंत आम्ही तसेच क्षुद्र राहणार. ती नोकरी नाहींशी झाली म्हणजे आम्हांस धंदेस्वातंत्र्य मिळेल. आणि निर्वाहाचे इतर उद्योग करतां येतील. आणि आमचेवरील क्षुद्रपणाचा आणि त्याबरोबर अस्पृश्यत्वाचाही डाग क्रमाक्रमानें नाहींसा होत जाईल.

आतां सरकारच्या नोकरीचा प्रश्न राहिला. त्यांचें उत्तर सोपें आहे. आमच्या जमिनी निवळ रयतावा झाल्यानें त्यांचा जो सारा सरकारांत जमा होईल; त्यांतून जरूरीप्रमाणें अवंश्य तितके नोकर ठेवण्यास आणि वाटेल त्यांजकडून पैसा देऊन काम करून घेण्यास सरकारांस कांहीच अडचण नाहीं.

करिता सरकारपाशीं आमची प्रार्थना आहे कीं, आमचीं सर्व महारकी ad इनामांतून कमी करून रयताव्यांत दाखल करावीत. आणि सर्व महारांना वतनी नोकरीतून मुक्त करावेत. सेवेशी श्रुत होय ही विज्ञापना.

तारीख २७:७।१९२१ ई.

महार लोकांच्या सह्या

हु. ऑ. नं. १६३

राव. सा. हुजूर चिटणीस यासी Se

आज्ञा केली ऐसीजे-

ह्या महार लोकांनी आपखुषीने इनाम जमीन रयतावा करून मिळणेंबद्दल केलेला अर्ज हुजूर पसंत आहे. या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यास इनाम जमीन