श्रीमन्महाराज छत्रपति साहेब सरकार करवीर यांचे सेवेशी - Page 544

४९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

रयतावा करून देणें हाच मार्ग उत्तम आहे. करितां सदर गांवच्या महारकी इनाम जमिनी इनामांतून कमी करून रैताव्यांत दाखल कराव्यात. सदर जमिनीवर कांही बाबी वगैरे बसलेल्या असल्यास त्या सर्व कमी करण्यात येत आहेत. या हुकमाचे आधारें महारांना रयताव्याचें पूर्ण हक्क देण्यात येत आहेत. त्यांच्याकडून कोणतीही नोकरी घेणेची नाहीं. ही आर्डर कोणत्याही ऑफिसांत तीन दिवसापेक्षा जास्त दिवस राहतां कामा नये. मामलेदार यांनी ऑर्डरचा अंमल केल्याबद्दल तात्काल रिपोर्ट करावा. जमीन ज्याचे ज्याचे ताब्यात आहे त्याचे त्याचेच ताब्यांत राहणेची आहे. कोणत्याही प्रकारें कबजा तबदील करणेचा नाही. कळावे.

रजपुतवाडी PAT सही---

ता. ५।८।१९२१ शाहु छत्रपति

रावसाहेब हुजूर चिटणीस यांसी

आज्ञा केली ऐसीजे

ज्या महार लोकांनी आपलीं वतनें रयताव्यांत दाखल करावीत म्हणून अर्ज केला असेल त्यांच्याकडून अर्जाच्या तारखेपासून नोकरी घेणेची नाहीं, त्यांचा वेठवरळा माफ करणेंत यावा. तराळ घस्त लोकांना वेठवरळा सांगणेचें नाही ; जर कोणी आपले मनगटाचे जोरावर सदर लोकांना वेठवरळा करणेस लावतील तर त्यांना नोकरींतून पेन्शन ज देतां कमी कलें जाईल; व वतनदार असलेस त्यास वतनांतूनही कमी केलें जाईल. याची दखलगिरी प्रत्येक गांवकामगारास द्यावी. याप्रमाणें जरूर तजवीज करावीं, कळावें.

शिरोळ क्यांप

ता. १५।७।१९२१ इ. शाहु छत्रपति

पहिल्यानें महार लोकांनीं वतनांचे राजीनामे दिले असतां पूर्वपरंपरेस अनुसरून कित्येक गांव कामगार व सरकारी नोकर महारांना जुलमाने कामें सांगत असत व वेठबिगार करवून घेत असत. म्हणून वरील sek देणे हुजुरांस भाग पडलें. सदर हुकमाच्या छापील प्रति सर्व महार लोकांस मिळतील अशी तजवीज करणेत आली होती. सबब अवलोकनार्थ सदर फार्म पाठविला आहे.

ब. ना. शिंगे

७७७

बहिष्कृत भारत : ता. ४ नोव्हेंबर १९२७