अशा वेळी ब्राह्मणेतरांनी विरोध करावा शरमेची गो - Page 546

५०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

परंतु पितांबर भाई यांनीं कांहीं कारणामुळें मि. सु. गो. टिपणीस यांनीं सुचविलें.

उपस्थित झाला. व अध्यक्षाच्या तें नाकारिलें. यानंतर सभेत बराच गोंधळ

विरोध जागेकरिता ७।८ नांवें सुचविली. व त्याला पाठिंबेही मिळाले व जोराचा झाला. विरोधाचें मुख्य कारण हेंच होतें की, जो अध्यक्ष होईल त्यानें दोन्ही बाजूचें ऐकून घेण्याचें कबूल केल्याशिवाय अध्यक्षस्थान स्वीकारू नये. मोठी शरमेची व लांछनास्पद गोष्ट ही कीं, त्या सुचविलेल्या नावांपैकी एकही तशा रीतींनें सभा पार पाडण्याचे आश्वासन देऊन अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे कबूल करीना. वास्तविक पाहिलें तर सभा सर्व नागरिकांची ! नागरिकांत कांहीं अस्पृश्यांचे बाजूचे असणार व कांहीं विरोधी असणार. ठराव सर्वांच्या मतानें पास व्हावयाचा. अध्यक्षाला सभेचें काम व्यवस्थेशिर पार पाडावयाचें एवढेंच असते. असें असतां एकांनेंही पुढें होऊन तयार व्हावयाचें नाहीं ही गोष्ट निंद्य होय ! या सुचविलेल्या नांवापैकी बहुतेक ब्राह्मण होते. त्यांपैकी एक गृहस्थ रा. धारप वकील हे होते. त्यांनी अरेरावीपणाचें धोरण स्वीकारून होत असलेल्या विरोधाची पर्वा न करितां अध्यक्षाच्या खुर्चीवर जाऊन बसले. तेव्हां लोकांनी विरोध केला. परंतु खुर्चीवर बसतांना ते म्हणाले की, मला सूचना आणून निवडिलें आहे व अनुमोदन मिळालें आहे. यावर पुन्हां कडक विरोध करण्यात आला. अगोदर अध्यक्षांनी आपली दोन्ही बाजूचीं मतें कशा स्वरूपाचीं आहेत

हें सांगितल्याशिवाय अध्यक्षस्थान स्वीकारू नये. रा. धारप या गोष्टीला कबूली देईनात, व ते जरा दांडगाई व अरेरावी करूं लागलें पण जास्त विरोध झाल्यावर निरुपायास्तव खाली बसले. रा. धारप यांना एवढीच सूचना करण्यांत आली

होती की, दोन्ही पक्षांचे ऐकून घ्यावयाचे, पण त्यांनी स्वीकारलेल्या एकतर्फी

धोरणामुळे, असें अनुमान दिसले की, ब्राह्मणशाहीचे एकतर्फी मत म्हणजे महाड

येथील सर्व नागरिकांचे मत, असा त्याच्यावर शिक्कामोर्तब करून सरकारकडे

कळवावयाचें; व ता. २५-१२-२७ रोजी होणाऱ्या सत्याग्रहाच्या विरूद्ध मनाईचा

हुकूम मिळवावयाचा.

अशा रीतींने अध्यक्षस्थान कोणी स्वीकारीना व रा. रा. वामनराव जोशी (वकील)

यांनी सांगितलें की, ही समा सत्याग्रहाला विरोध करण्याकरितांच ठराव पास करावा म्हणून जमविण्यांत आली आहे, व याच्या विरूद्ध जे असतील त्यांनी सभा सोडून जावे. यावरहि कडक विरोध करण्यांत आला, व जनतेचें मत वरील महाशयाच्या सूचनेमुळें फारच प्रक्षुब्ध झालें. कारण आजची तरी सभा सर्व नागरिकांची आहे, व आजच्या सभेंत हजर असलेल्या थोड्या लोकांकडून कां होईना, जो ठराव होईल तो सर्वानी पास केलेला ठराव असें समजण्यांत येऊ नये,