poii अशा वेळी ब्राह्मणेतरांनी ` : ` ` ` ` ` ` शरमेची गोष्ट ५०१
अशी सूचना रा. रा. सु. गो. टिपणीस यांनी आणिलीं, व त्याप्रमाणे सभेत कोणीही उठलें नाही. हे जसें घटकाभर झाले तसें रा. रा. वामनराव जोशी हे आपला पराजय झाला असें पाहून खालीं बसलें, व पुनः असें सांगितलें कीं, आतांची सभा बरखास्त झालेलीं आहे, व पुढें या बाबतींत सभा भरविण्यांत येईल. यावर रा. टिपणीस यांनी सर्व लोकांस सांगितलें कीं, 'आतांची सभा बरखास्त झालेलीच आहे असें ज्या अर्थी सांगण्यात येत आहे त्याअर्थी पुन्हा पुढें होणाऱ्या सभेंत सर्व नागरिकांनीं परत हजर राहून ठराव पास किंवा नापास करण्याबद्दल जागृत असलें पाहिजे, व आपलें योग्यमत निदर्शनास आणून देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. '
अशा रीतीनें दोन तास चाललेला हा गोंधळ, सभेंत कोणत्याही प्रकारचा निर्णय न लागतां रात्री ८ वाजतां खलास होऊन सभा बरखास्त झाली.
बहिष्कृत भारत : ता. २३ डिसेंबर १९२७.