स्वराज्याची सर सुराज्याला नाही ! - Page 55

स्वराज्याची सर सुराज्याला नाही ११

प्रधान हेतु होऊन बसतो. कोणतेंहि राष्ट्र घेतलें तर त्यात वर्ग व तट हे असावयाचेच. इतकेच नव्हे, तर वर्गावर्गांचे, तसेच व्यक्तीचे सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक हितसंबंध परस्परविरोधी असतात. अशा विरोधामुळे एका व्यक्तीने किंवा वर्गाने आपला चांगभले करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर किंवा वर्गावर चढण्यास सुरवात केली किंवा जिवास घात किंवा मिळकतीस नुकसान करण्यास किंवा अन्य तर्‍हेनें अपाय करण्यास सुरवात केली तर अंतस्थ शांततेचा भंग होण्याचा संभव असतो ; आणि शांततेशिवाय सामाजिक जीवन धोक्याचे होऊन मानवांत नित्य होत असलेला कार्यक्रम बंद पडतो. अशामुळें शासन हा जरी महत्त्वाचा हेतु आहे तरी नुसतें शासन करणाऱ्या-म्हणजे प्रजेस अमुक करूं नका व करून शांतता मोडल्यास दंड होईल असें बजावणाऱ्या-राज्यपद्धतीला हल्लीच्या काळीं तारतम्याने रानटी म्हणावी लागेल. सुधारलेल्या राष्ट्रांतील राज्य पद्धतीचा कल जितका शासनाकडे असतो तितकाच संस्कृती wee असतो. आहे त्यापेक्षां प्रजेची उन्नति अधिक कशी होईल याचे मार्ग आंखणें, तिची साधनें सर्वांना सारखीं उपलब्ध करून देणें, उन्नतीस अनुकूल अशी परिस्थिति उत्पन्न करणें हा राज्य करण्याचा दुसरा हेतु शासनाइतका किंबहुना अधिक महत्त्वाचा होऊन बसला आहे.

राज्यकारणाचे हे दोन हेतु परिस्थित्यनुरूप निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रमाणांत अमलांत येतात. जेथें राज्यकारभार एका विशिष्ट वर्गाचे हित होऊन बसतो, मग तो वर्ग स्वकीयांचा असो वा परकीयांचा असो, तेथें संस्कृतिपेक्षा शासनासच प्राधान्य मिळतें. कारण शांतताभंगामुळें त्यांच्या अंमलाला धोका येण्याचा संभव असतो. शांतता जरी अवश्य आहेत तरी शांततेच्या नांवाखाली जुलूम होणें अगदीं साहजिक असतें. कारण शांतता ठेवण्यास कोणाच्या तरी स्वातंत्र्याला निर्बध घालावाच लागतो. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला केव्हां निर्बध घालावा व केव्हां घालूं नये याचा निर्णय करितांना स्वातंत्र्य आणि स्वच्छंद असा भेद केला पाहिजे. परंतु स्वातंत्र्य कायम ठेऊन त्यांचें स्वच्छंदांत पर्यवसान न होऊ देणें हें इतकें नाजुक काम आहे, की, बऱ्याच प्रसंगी स्वातंत्र्याचा उच्छुखलपणा मोडण्यासाठी स्वातंत्र्यावरच गदा येते. स्वातंत्र्य नष्ट झालें असतां शांतता रहाते पण व्यक्तिविकास होत नाही. म्हणून शासनातिशयामुळे नुकसानच होतें. दुसरा असा आक्षेप आहे की, परकीयांच्या अंमलाखाली राज्यकर्ते आपल्या जातभाईंच्या हितासाठी प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष्य करितात, नव्हे, त्याची आहुति देतात. एवंच एकाद्या देशावर दुसऱ्या देशाची सत्ता असल्यानें अंमलाखाली असणाऱ्या लोकांचा फायदा क्वचितच होतो, हा नियम सर्व