१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तज्ज्ञांस संमत आहे. परंतु हिंदुस्थानांतील इंग्रजी अंमल या बाबतींत अपवाद म्हणून गणला जाईल यांत संशय नाहीं. ज्या या हिंदुस्थान देशांत अनेक परचक्रें येऊन त्यांनी लोकांना त्राहित्राहि करून सोडलें, ज्यात अनेक राजकीय बंडांमुळें प्रजेला शांतता म्हणजे मोठी दुर्मिळ चीज झाली होती, अशा ह्या त्रस्त देशाला ब्रिटिश सत्तेमुळे झालेला शांततेचा लाभ टाकाऊ म्हणतां येईल काय ? तसेंच ज्या हिंदुस्थानाचा संस्कृतीच्या दृष्टीनें रानटी लोकांत पहिला नंबर अथवा सुधारलेल्या राष्ट्रांत शेवटचा नंबर लागला असतां तो देश नूतन स्थापन होत असलेल्या राष्ट्रसंघात सामील होण्यास लायक झाला आहे ही ब्रिटिश अमदानींत झालेली त्याच्या संस्कृतीची वाढ कमी झाली असें म्हणणें सत्याच्या कसोटीस फारसें उतरेल असें वाटत नाहीं. परंतु स्वकीयांच्या अंमलाखाली जर प्रजा संतुष्ट नसते हें अनुभवसिद्ध आहे तर परकीयांच्या अंमलाखाली ती असंतुष्ट असल्यास त्यांत ASS नवल नाहीं आणि परकीय अंमल हितावह जरी असला तरी केवळ परकीय म्हणून पारतंत्र्यांत अडकून राहिलेल्या लोकांचे लक्ष्य नेहमीं आपल्यावर हुकमत चालवणारांच्या दोषांकडे वेधलेलें असतें. याच न्यायाने आज इंग्रजी अमलाविरुद्ध बरीच चळवळ चाललीं आहे. या चळवळीच्या मुळाशीं जो हेतु आहे त्याची छाननी करणें अगदी जरूर आहे.
राष्ट्रीयसभा-जिला काँग्रेस असें म्हणतात ती याच चळवळीची जननी होय. ही सभा प्रतिवर्षी भरते. तिचें ३४ वे अधिवेशन गेल्या नाताळांत अमृतसर शहरीं झालें. ही राष्ट्रीयसभा सन १८८५ मध्यें अस्तित्वांत आली व ती अस्तित्वांत येण्याची कारणें अगदीं साहजिक आहेत. कोणत्याहि देशाला आपली खरी स्थिति काय आहे हें तारतम्यानें poda. आपण श्रीमंत आहों की गरीब आहों, बरें आहोंत कीं वाईट आहोंत, ज्ञानवान आहोंत किंवा ज्ञानहीन आहोंत, गौरवर्णीय आहों की कृष्णवर्णीय आहों हें इतरांकडे नजर फेकल्याशिवाय कळत नाहीं. त्याचप्रमाणें, एका राष्ट्राला आपण इतर राष्ट्रांपेक्षा पुढारलेलें आहों किंवा मागासलेले आहों हें कळण्यास त्याला इतर राष्ट्रांचा अभ्यासानें किंवा दळणवळणाने परिचय व्हावा लागतो. त्याशिवाय कोणाहि एकलकोंड्या राष्ट्रास तुलनेच्या अभावीं आपली निकृष्ट अशी स्थिति उत्कृष्ट आहे असें वाटून तिच्यांतच कुजत पडण्यांत वावगें वाटत नाही. या दृष्टींनें येथील लोकांना आपल्या खऱ्या स्थितीचें सापेक्षत्वानें व व तुलनेने आकलन होण्यास हिंदुस्थानाचा व इंग्रजांचा प्रजा आणि राजा या नात्यानें घडून आलेला निकट संबंध फार महत्त्वाचा आहे. इंग्रजी विद्या म्हणजे केवळ “ वाघिणीचे दूध. “ तें ज्यांना म्हणून प्राशन करावयास सांपडलें, त्यांच्यांत नवा उत्साह, नवीन तेज, नवीन स्फूर्ति उत्पन्न झाली. ज्यांना