श्रीधर टिळकांची आत्महत्त्या ? - Page 556

५१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

विचार करून पाहिले, आजच्या नवीन नवमतवादी पिढीचा विचार केला तर त्यात कै. श्रीधरपंत मोठ्या लोकमान्यतेस पात्र होते असे म्हटल्याशिवाय राहवत नाही. समाज समता संघाच्या चळवळीला मुद्दाम जाणूनबुंजून जे एक प्रकारचे निष्कारण छळावे असे हीन वृत्तीचे वातावरण हिंदुस्थानात उत्पन्न होत होते, त्याला टक्करच म्हणून की काय श्रीधरपंतांनी समाज समता संघाची शाखा प्रत्यक्ष आपल्या घरी-लोकमान्यांच्या गायकवाड वाड्यात-स्थापन करून जे अलौकिक धैर्य दाखविले ते खरोखर कौतुकास्पद होते.' नंतर डॉ. आंबेडकर यांनी कै. श्रीधरपंतांच्या आत्महत्त्येचा संबंध समाज समता संघाशी द्राविडी प्राणायामाने कित्येक लोक जोडीत आहेत त्यांना स्पष्ट उत्तरच की काय असे कै. श्रीधरपंतांचे शेवटचे डॉक्टरसाहेबांना आलेले पत्र त्यांनी वाचले. (पत्रातील मजकूर दुसरीकडे त्यांच्या स्वदस्तुरच्या पत्राचा फोटो ब्लॉक करून दिला आहे.) आणि ते पुढे म्हणाले की समाज समता संघावर जे आरोप करण्यात येत आहेंत ते किती फोल आहेत याची कल्पना त्यांच्या पत्रावरून सहज करता येईल. दोन्ही बाजूचा विचार केला तर संघाविषयी उठलेल्या पुणेरी कंड्यांत काही अर्थ नाही हे कळून येईल. ज्याचा सारा जन्म जुन्या पंरपरेत जुन्या विचारांच्या माणसात आणि आचारविचारात गेला तो त्या परिस्थितीला चिकटून न रहाता-ती घातुक परिस्थिती साफ बदलून टाकण्याकरिता-उदारमतवादी समाज समता संघाला आणि त्याच्या नवमतवादी तत्त्वाला सहाय्य करतो त्या त्याच्या धैर्याची आणि धडाडीची तारीफच केली पाहिजे. त्यांच्यासारखा तेजस्वी कार्यकर्ता पुरुष आपल्यातून अकाली काळाच्या भक्षी पडावा, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय |

दुखवट्याच्या ठरावावर बोले, वरेरकर मामा. सौ. मनोरमाबाई प्रधान, पी. आर. लेले, ठाकरे, देवराव नाईक, द. वि. प्रधान आणि केंद्रेकर यांनी भाषणे केली. (पा. ९) | |

दुनिया पत्राच्या दहाव्या थानावर श्रीधर टिळक यांची तीन पत्रे प्रसिद्ध करण्यात

आली होती :- |

समाज समता संघाविषयी महत्त्वाची पत्रे

GAIKWAR WADA

POONA CITY

2nd May 1928 Dear Mr. Pradhan,

Your letter of the 30th ult. | have no objection whatsoever to lend my Hall for the intercaste marriage arranged by you. | am glad you have