स्वराज्याची सर सुराज्याला नाही १३
म्हणून इंग्रजी विद्या संपादितां आली त्यांनीं युरोपीयन देशांच्या इतिहासाचें परिशीलन करून अनियंत्रित राजसत्तेमुळें तोटे काय होत असतात हें जाणिलें,
व स्वतंत्रतेच्या कल्पना त्यांच्या मनांत घोळू लागल्या. इंग्रजी विद्येच्या प्रभावाने
त्यांना राजा आणि प्रजा यांचे हक्क कळूं लागले. हें वाघिणीचे दूध पिऊन पुष्ठ
झालेल्या या पिलांनीं इंग्रजांच्या सत्तेच्या विरुद्ध प्रजापक्षाच्या वतीनें भांडण्यास जारीनें सुरवात केली.
इंग्रजी राज्य जरी परकीय लोकांचे राज्य आहे तरी कांहीं सरकारी अधिकारी वजा जातां त्यांनीं प्रजापक्षाच्या या सभेस वारंवार सहानुभूति दाखविली. इतकेच नव्हे तर खुद्द हिंदुस्थानचे माजी गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन यांनीं तिच्या उभारणीस हातभार लावला, व आपली सहानुभूति केवळ शब्दांत न ठेवतां तिच्या मागण्यास अनुसरून आपल्या राज्यव्यवस्थेत सुधारणा करण्यास मागें घेतलें नाही, हें त्यांस भूषणावह आहे. हा प्रजापक्ष उभारल्यापासून ब्रिटिश सरकाराने शिक्षणाच्या बाबतींत उदारबुद्धीचें धोरण स्वीकारलें आहे. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचें करण्याचा क्रम सुरू केला आहे. व्यावहारिक व शास्त्रीय शिक्षणाकरितां शिष्यवृत्ति निर्माण करण्यात आल्या आहेत. आरोग्याच्या बाबतींत सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत आहे. दारूसारख्या मादक पदार्थावर कर वाढवून दारूच्या व्यसनास आळा घालण्यास, दारूचे गुत्ते बंद करण्यास किंवा दारूची विक्री नियंत्रित करण्यास सुरूवात झाली [आहे. ] लोकांच्या तक्रारी ऐकून जंगलासंबंधी चाऱ्याची व जळाऊ लाकडांची सवलत [देण्यांत ] [येत ] आहे. मिठावरील कर कमी केला आहे. प्राप्तीवरील कराची किमान मर्यादा वाढविली आहे. पोलीसखात्यांतील वरिष्ठ व दुय्यम प्रतीच्या जागा [व ] [लष्करी ] खात्यांतील वरिष्ठ दर्जाचे हुद्दे एतद्देशीय लोकांस मिळूं लागले आहेत. मुलकी, शिक्षण इत्यादि खात्यांतील वरिष्ठ प्रतीच्या नोकऱ्या [त्यांना ] [मिळाव्या ] [असे ] [नुकतेंच ] ठरले आहे. शेतकीची सुधारणा, तसेंच पतपेढ्यांची स्थापना सरकार जोरानें करीत आहे. इतकेंच नव्हे तर, प्रजेंतील लायक व जबाबदार [अशा ] [माणसांस ] प्रांतिक व वरिष्ठ कायदेमंडळांत घेऊन [त्यांच्या ] [सल्ल्याने ] [कायदे ] [ठरविले ] [जात ] आहेत. प्रजापक्षाकडील माणसांना कायदेकोन्सिलांत [घेण्याच्या ] [पद्धतींतहि ] सरकारनें उत्तरोत्तर उदारपणाचें धोरण [दर्शविलें ] [आहे. ] प्रथमतः म्हणजे १८६१ सालीं जेव्हां प्रजापक्षाकडील माणसांस [सरकारी ] [कायदेकौन्सिलांत ] [घेण्याचें ] [तत्त्व ] मान्य झालें, त्या वेळेपासून तों १८९२ [पर्यंत ] [सरकारी ] [निवडणुकीत ] [प्रजेतील ] कोणत्या माणसांना घ्यावें [हें ] [सरकारच्या ] [आवडीनिवडीवर ] [अवलंबून ] [असे. ] पण सरकारनें निवडलेला सभासद [प्रजेच्या ] [हिताला नेहमीच ] [जात ] [असे, ] [असें ]