डिप्रेस्ड क्लासेस मिशन ५१५
राजकीय हितासंबंधी कैफियत मांडावी म्हणून सरकारकडून त्यांना आमंत्रण येणे
अटळ होते. डॉ. आंबेडकर त्यावेळी सिडन्हँम कॉलेजात प्रोफेसर होते. खुद्द
अस्पृश्य वर्गातील एकाद्या व्यक्तीने कमिटीपुढे कैफियत सादर करावी, असे सरकार, चंदावरकर व शिंदे यांना वाटले नाही. हे वैगुण्य डॉ. आंबेडकरांच्या लक्षात आले. ते सरकारी नोकरीत होते तरी गर्व्हनर साहेबांशी पत्रव्यवहार करून त्यांनी साऊथबरो कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी आपली निवड करून घेतली. शिंदे व डॉ. आंबेडकर यांनी आपापल्या कैफियती भिन्न दृष्टिकोनातून
मांडल्या.
अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता यावे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनिधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात, अशी डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्यांतर्फ साऊथबरो कमिटीपुढे साक्ष दिली. या बाबतीत त्यांनी आपली लेखी कैफियत सादर केली. त्यांनी त्या कैफियतीत साधार माहिती देऊन अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची बाजू उत्तम रीतीने मांडली. वरील प्रकारचे राजकीय हक्क उपभोगण्यास जी लायकी पाहिजे ती सरकारने अस्पृश्यांची हीन व दीन अवस्था लक्षात घेऊन ठरवावी, असेही डॉ. आंबेडकरांनी सुचविले. डॉ. आंबेडकरांनी आपली कैफियत वर्तमानपत्राकडे पाठविली ; पण वर्तमानपत्रांनी तिची दखल घेतली नाही. अस्पृश्य वर्गातील लोकांनी आपल्या राजकीय हक्कांसाठी जाहीर सभा घ्याव्यात, असे डॉ. आंबेडकरांनी मुंबईतील समाजसेवकांना सुचविले. परंतु ह्यावेळी बहुतेक समाजसेवक शिंदे व सर नारायणराव चंदावरकर यांच्या सल्ला मसलतीने चळवळ करीत असत. भारतमंत्री माँटेग्यू हे हिंदुस्थानात दौऱ्यावर आले तेव्हा त्यांच्यापुढे अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी मांडण्यासाठी चंदावरकर यांच्या प्रेरणेने काही अस्पृश्य समाजसेवकांनी एक शिष्टमंडळ नेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे ते शिष्टमंडळ चंदावरकर यांच्याच नेतृत्वाखाली माँटेग्यू साहेब मुंबईत आले तेव्हा त्यांना भेटले. ही बाब लक्षात घेतली म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या सूचनेप्रमाणे अस्पृश्यांनी राजकीय हक्कांसाठी जाहीर सभा स्वतंत्रपणे का भरविल्या नाहीत, हे स्पष्ट होईल. शिंद्यांनी आपल्या कैफियतीला लोकमत मिळावे म्हणून चळवळ केली. मि. ए. आर. बॅनर्जी, ।. 0. 5. यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची एक जाहीर सभा बंगलोरमध्ये भरविण्यात आली, तिचा वृत्तांत 'टाईम्स ऑफ इंडिया' च्या ता. २ डिसेंबर १९१८ च्या अंकात (पा. १०) प्रसिद्ध झाला. सभेत शिंदे यांचे अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांबद्दल भाषण झाले. राष्ट्रीय हिताला बाधक अशी अस्पृश्यांसाठी राजकीय