हिंदी स्वातंत्र्य संघ बंगाल शाखेचा जाहिरनामा स्वातंत्र्य संघाचा कार्यक्रम - Page 565

परिशिष्ट-४०
हिंदी स्वातंत्र्य संघ
बंगाल शाखेचा जाहिरनामा

स्वातंत्र्य संघाचा कार्यक्रम

राजकीय-पूर्ण स्वातंत्र्य

सामाजिक--(१) जातीचें उच्चाटन-म्हणजे अस्पृश्यता निवारण; À व विहिरी यांचा सर्वांना पूर्ण उपभोग घेऊ देणें; देवळांत सर्वांना प्रवेश; सहभोजन; सहविवाह, (२) स्त्रियांचे स्वातंत्र्य-म्हणजे पडदा काढून टाकणें; स्त्रियांना सक्तीचे शिक्षण व शारीरिक शिक्षण देणें; विधवांना पुनर्विवाहास स्वातंत्र्य; स्त्री-पुरुषांना समान हक्क व स्त्रियांच्या हक्कांच्या कायद्याची दुरुस्ती, (३) बहुभार्यत्व नष्ट करणें; आंतप्रातीय विवाहांना उत्तेजन; लग्नाची स्त्री-पुरुषांची वयोमर्यादा वाढविणें व लग्नाची किमान मर्यादा ठरविणे; कोणत्याही प्रकारचा हुंडा अगर वरदक्षिणा रद्द करणें, (४) वंशपरंपरा गुरू अगर भटजी होण्याचा हक्क नष्ट करणें; धंदेवाईक भिक्षुकांच्या मदती शिवाय ज्याची त्यांने धर्मकृत्यें करावीं अशाबद्दल उत्तेजन देणें.

आर्थिक .--मुख्य तत्त्वेअ) आर्थिक विषमता नष्ट करणें, (आ) संपत्तीची समान वाटणी, (इ) सर्वांना पुढें येण्यास सारखी संधी देणें, (ई) रहाणी (स्टँडर्ड

ऑफ लाइफ) उच्च दर्जाची करणें.

कार्यक्रम-१) मोठ्या प्रमाणावर यंत्रसहाय्यानें पदार्थांची निपज वाढविणे व गृहधंद्यांना उत्तेजन देणें, (२) महत्त्वाचे धंदे राष्ट्राच्या मालकीचे करणें, (३) रेल्वे, जहाजें व विमाने हीं राष्ट्राच्या मालकीचीं करणें, (४) कारखान्यांच्या व्यवस्थेत आणि नोकरांच्या नेमणुका व बडतर्फी याबाबत मत देण्याचा कामगारांना अधिकार राहील, (५) त्यांना कारखान्यांतील नफ्याचा वाटा मिळावा, (६) संप किवा ' लॉक आऊट ' ची जरूरी राहूं नये म्हणून मालक व मजूर यांचीं भांडणें मिटविण्यासाठी एक निःपक्षपाती तडजोडमंडळ नेमणें, (७) खासगी संपत्तीला कायद्याने मर्यादा घालणें व वडिलोपार्जित संपत्तीवर कर लादणें, (८) सहकारी पेढ्यामार्फत कमी व्याजावर कर्ज पुरविणे, (९) फॅक्टरी कामगारांचा ८ तासांचा कामाचा दिवस करणें, (१०) बेकारी व म्हातारपणाचा मुशाहिरा सरकारने द्यावा,