५२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
(११) आजारीपणा, बाळंतपण, रहाण्याला चाळी, सुटी, मजूर-बालकांना पाळणें, अन्न पुरविणें वगैरे, व इतर बाबतींत मजुरांना मदत करून त्यांची स्थिती सुधारणें, (१२) सर्वत्र जमीनधारा सारखा घेण्यांत यावा, (१३) जमीनधारा योग्य प्रमाणांतच घेण्याचें सरकारनें आश्वासन द्यावें, (98) मालगुजारांना व जमीनदारांना भरपाई देऊन मालगुजारी व जमीनदारी नष्ट करणें, (१५) सरकारनें मध्यस्थी करून शेतकऱ्यांच्या सावकारांची भरपाई करून देऊन त्यांना कर्जमुक्त करणें.
महाराष्ट्र शाखा
धोरण व कार्यक्रम .--१. स्वतंत्र हिंदुस्थानची " काँग्रेस “ हीच मुख्य राजकीय सभा बनविण्यांत यावयाची असल्यामुळे देशांतील सर्व काँग्रेसच्या संस्थांवर संघाच्या सभासदांनी आपला ताबा राखें.
२. पांच वर्षांनंतर हिंदुस्थानचे स्वातंत्र्य जाहीर करणें व तें काँग्रेसच्या द्वारा जाहीर करणें, संघाची चळवळ तीव्रतेनें होण्याच्या दृष्टीनें अशी निश्चित कालमर्यादा घालणें जरूरीचें आहे.
३. या मधल्या कालांत सत्याग्रह, असहयोग, करबंदी व सार्वत्रिक संप इ. सर्व शांततायुक्त साधनांनी प्रत्यक्ष प्रतिकारात्मक चळवळ करण्याकरितां राष्ट्राची तयारी करणें.
४. पुढील विधायक कार्यक्रम अंमलांत आणल्यास राष्ट्राची स्वातंत्र्य युद्धाकरितां योग्य ती तयारी होईल :--(१) ज्ञातिहितवादाला सर्व बाजूनीं विरोध करणें, (२) राष्ट्रीय नागरिक-दल निर्माण करणें, (३) जाति व धर्म लक्षांत न घेतां सर्वांना नागरिकत्वाचे हकक सारखेच उपभोगण्यास मिळतील अशी चळवळ करणें, (४) मजूर व शेतकरी यांची संघटना करणें, (५) राष्ट्रांतील मुख्य महत्त्वाचे धंदे व राष्ट्रीय संपत्युत्पादनाची साधनें यांचे राष्ट्रीयकरण करणें, (६) स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यांत घेऊन त्यांना राष्ट्रीय स्वरुप देणें, (७) काँग्रेसचा विधायक कार्यक्रम अंमलांत आणणें व तसें करतांना खादी प्रसार व अस्पृश्यता निवारण यांवर विशेष भर देणें.
५. आशियाटिक राष्ट्रसंघांतील एक स्वतंत्र घटक अशी स्वतंत्र हिंदुस्थानास मान्यता मिळविण्याच्या हेतूनें व हिंदुस्थानच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या चळवळीबद्दल आशियाटिक राष्ट्रांची सहानुभूति मिळविण्याकरितां स्वातंत्र्यसंघाचें एक शिष्टमंडळ आशियाटिक राष्ट्रांत पाठवावे. तसेंच लवकरच काबूल येथें होणाऱ्या आशियाटिक ाष्ट्रपरिषदेच्या बैठकीसही हजर राहण्याकरितां स्वातंत्र्यसंघातर्फे प्रतिनिधी पाठवावे.