हिंदी स्वातंत्र्य संघ ५२१
घटना .--१. संघाचें नांव ' हिंदी स्वातंत्र्य संघ ' असें असावें.
२. काँग्रेसने ठरविलेल्या सर्व भाषावार प्रांतात संघाच्या शाखा स्थापन करण्यांत याव्या. या प्रत्येक शाखेवर एक पगारी चिटणीस असावा. त्याचा पगार ७५ रु. पेक्षां कमी नसावा.
३. प्रांतिक शाखांनीं जिल्हा शाखा स्थापन करून त्या प्रांतिक शाखांना जोडून घ्याव्या.
४. प्रांतिक शाखांनी प्रत्येक जिल्ह्याकरिता एक पगारी प्रचारक नेमावा. त्याचा पगार ५० रु. पेक्षां कमी नसावा.
५. प्रांतिक शाखेवरील सेक्रेटरी व जिल्ह्यांतील प्रचारक यांची नेमणूक करतांना त्यांनीं केलेल्या सार्वजनिक कामांचा विचार करण्यांत यावा.
६. पुढील वर्षी काय काम करावयाचे याचा विचार करण्याकरितां दरसाल जानेवारी महिन्यांत प्रांतिक शाखेच्या सभासदांची परिषद भरविण्यांत यावी व त्याच वेळीं प्रांतिक शाखेचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ यांची निवडणूक करण्यांत यावी.
७. वर्गणीच्या किंवा देणगीच्या रुपानें दरसाल संघाचा कार्यक्रम चालू ठेवण्याकरितां दोन लाख रुपये जमा करावे. हा सर्व राष्ट्रीय फंड संघाच्या मुख्य कचेरीच्या ताब्यांत असावा. प््रांतांप्रांतांतून तेथें चालू असलेल्या राष्ट्रीय चळवळींच्या जरूरीप्रमाणे त्यांना पैशाचा पुरवठा करण्यांत यावा.
बहिष्कृत भारत, ता. १६ नोव्हेंबर १९२८.