पं. जवाहरलाल मोतीलाल नेहरू - Page 569

पं. जवाहरलाल मोतीलाल नेहरू ५२३

जवाहरलाल १९१२ मध्ये शिक्षण संपवून भारतात परत आले, काही काठ वकिली करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण त्यात त्यांचे मन रमले नाही. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना राजकारणात आस्था वाटू लागली होती. या काळात ८ फेब्रुवारी १९१६ मध्ये त्यांचा कमल कौल या दिल्लीतील स्वजातीय युवती बरोबर विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये झाली. त्यांपैकी इंदिरा गांधी (१९१७) भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या, तर दुसरा मुलगा (१९२७) जन्मतः मरण पावला. कमला नेहरूंनी इतर कुटुंबियांबरोबर स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. कारावासातील जीवन व क्षयरोग यांमुळे ऐन उमेदीत त्या मरण पावल्या (१९३६). लखनौ काँग्रेसच्या अधिवेशनात जवाहरलाल यांची गांधीजींशी पहिल्यांदा भेट झाली (१९१६). अन्यायाचा नुसता निषेध करून उपयोग नाही, तर त्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि हा प्रतिकार अहिंसात्मक असला पाहिजे, या गांधींच्या सूत्राने ते त्यांच्याकडे विशेष आकर्षित झाले. ब्रिटिश सरकारशी लढताना भीती वा द्वेष यांना थारा देता कामा नये, हा गांधीजींचा दंडकही त्यांना पटला.

पंडितजींचा काँग्रेसशी घनिष्ठ संबंध १९१९ सालापासून आला. १९१९ मध्ये एका रात्री रेल्वेने प्रवास करीत असताना जवाहरलालांच्या डब्यातच जनरल डायर (जालियनवाला बागेतील हत्याकांड करणारा) बसला होता. त्याचे एकूण अत्याचारांविषयीचे रसभरित वर्णन जवाहरलालांनी ऐकले. ते ऐकून जवाहरलाल हादरले व तेथून पुढे ते कट्टर साम्राज्यविरोधी बंडखोर बनले. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने जी बिन सरकारी चौकशी समिती नेमली होती, त्या समितीला पंडितजींनी साहाय्य केले. गांधीजींनी १९२१ मध्ये असहकाराची

चळवळ सुरू करताच जवाहरलालना प्रथम अटक झाली. तुरुंगात जाण्याचा

हा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. तेव्हापासून त्यांच्या तुरुंगयात्रा सुरू झाल्या. पुढील २५ वर्षांत ते अनेक वेळा तुरुंगात गेले व एकूण पंधरा वर्षे त्यांनी तुरुंगात काढली. त्यांचा अखेरचा तुरुंगवास १९४२ च्या छोडो भारत चळवळीच्या वेळी घडला. त्या वेळी अहमदनगरच्या किल्ल्यात त्यांनी जवळजवळ तीन वर्षे काढली.

जवाहरलाल यूरोपमधून परत आले, त्या वेळी भारतात सायमन आयोगाविरोधी निदर्शनांची लाट उसळली होती. जवाहरलालांनी लखनौ येथे निदर्शनाचे नेतृत्व केले. पोलिसांनी त्यांच्यावरही लाठीमार केला. त्याचा परिणाम १९२९ च्या लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. रावी नदीच्या तीरावर त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्राने संपूर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली. या