पं. जवाहरलाल मोतीलाल नेहरू - Page 570

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५२४

पंडितजींच्याच नेतृत्वाखाली १४ ऑगस्ट संपूर्ण स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेची सांगता

केली. इतिहासात असा अपूर्व योगायोग १९४७ रोजी रात्री १२ वाजता देशाने

क्वचित आढळतो.

(१९३६). मुख्यतः काँग्रेसने प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका लढविल्या

जवाहरलाल नेहरूंच्या तुफानी दौऱ्याने काँग्रेसला भरघोस यश मिळवून दिले. जवाहरलाल हे काँग्रेसला मते मिळवून देणारे जादूगारच ठरले. यावेळी यूरोपमध्ये फॅसिझम व नाझीवाद यांचा उदय झाला होता. स्पेनच्या लोकनियुक्त सरकारविरूद्ध जनरल bar हिटलर-मुसोलिनीच्या मदतीने बंड सुरू केले होते. त्यामुळे जवाहरलाल व्यथित झाले. फॅसिझम व नाझीवादाचे मानवतेला असलेले धोके त्यांनी बरोबर ओळखून भारतीय जनतेलाही सावध करण्याचे व शिक्षण देण्याचे कार्य केले. ते यूरोपच्या दौऱ्यावर गेले (१९३७). स्पॅनिश जनतेच्या युद्धात त्यांना भाग घ्यावयाचा होता; पण ते शक्य झाले नाही. इथिओपियावर मुसोलिनीने केलेल्या आक्रमणाविरूद्ध आपला तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी त्यांनी रोमच्या विमानतळावर मिळालेले मुसोलिनीचे भेटीचे निमंत्रणही धुडकावून दिले. फॅँसिझमविरोधी लढ्यात ब्रिटन व फ्रान्स या लोकशाही देशांच्या बाजूने भारत उभा राहील, मात्र तो स्वतंत्र भारत म्हणूनच असे

सहकार्य करू शकेल, हे त्यांनी त्या वेळीच स्पष्ट केले होते.

जवाहरलाल नेहरू हे प्रथमपासून फाळणीचे कट्टर विरोधक होते. जिनांचा fare सिद्धांत त्याना मान्य नव्हता. विविधतेतून भारताची एकता व

एकराष्ट्रीयत्व संपन्न झाले आहे, असा त्यांचा दृष्टिकोण होता; परंतु देशातील परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी व वल्लभभाई पटेल इत्यादींनी आपले हे मत बदलले व फाळणीला मान्यता दिली. अशा रीतीने देशाची फाळणी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा उदय झाला आणि जवाहरलाल हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. या पदावर ते आमरण राहिले.

३० जानेवारी १९४८ रोजी म. गांधींची हत्या झाली. या भीषण घटनेने

जवाहरलालांना फार धक्का बसला. ' आपल्या जीवनातील प्रकाश हरपला '

असे करूण उद्गार त्यांनी काढले. पंतप्रधान म्हणून अठरा वर्षांच्या कारकीर्दीत पंडितजींची लोकप्रियता ओसरली नाही. अंतर्गत व आंतरराष्ट्रीय राजकारणात

काही महत्त्वाचे उपक्रम त्यांनी केले. त्यांच्या कारकीर्दीत भारतीय संविधान

तयार झाले व संसदीय लोकशाही शासनाची सुरुवात झाली. हिंदू कोड बिल

मंजूर होऊन हिंदू महिलांना वारसा-घटस्फोटाचे हक्क मिळाले. संविधानात

अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली. भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र