स्वराज्याची सर सुराज्याला नाही ! - Page 58

१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

नाहीं. बहुधा तो हांजी-हांजी करणारांपैकीं असे. निदान कौन्सिलातील आपली जागा कायम राखण्यासाठी सरकारची मर्जी राखावी म्हणून प्रजापक्ष सत्य असूनहि स्वार्थासाठी त्याची आहुति देत असे. आपण नेमलेले सभासद जी-हुकुम म्हणणारे आहेत, प्रजेचे हितकर्ते नव्हतं, अशा टीकेमुळें नेमणुकीच्या ऐवजीं निवडणुकीचें तत्त्व अमलांत आणलें आहे. एकूण ब्रिटिशराज्यपद्धतीचा कल वर्षावर्षी सुराज्यपद्धति करण्याकडे आहे हैं त्यांच्या कड्या शत्रूलाहि कबूल करणे भाग आहे.

प्रजापक्षाची ही राष्ट्रीय सभा ब्रिटिशराज्यपद्धति सुराज्यपद्धति करून आणण्यासाठी जन्मास आली हें जर खरें आहे तर वर निर्दिष्ट केलेल्या सुधारणा पाहून तिचें समाधान झालें पाहिजे. परंतु समाधान न होता उलट असंतोषच जास्त वाढला आहे असें दिसून येतें. याचे कारण या राष्ट्रीय सभेच्या आद्य हेतूंत झालेला बदल हेंच होय. तिला आता सुराज्य नको, कारण ' स्वराज्याची सर सुराज्याला नाहीं ' या नवीन तत्त्वाने तिच्यावर पगडा बसविला आहे. निव्वळ तत्त्वाला हरकत नाहीं पण व्यावहारिक दृष्ट्या-आणि तत्त्वापेक्षां व्यवहारच श्रेष्ठ आहे-स्वराज्य कोणाचें व तें कशासाठी हें कळल्याखेरीज या तत्त्वाची री आम्ही तरी ओढू शकत नाही. मग कोण ओढील तो ओढो बिचारा ।

अग्रलेख : मूकनायक, ता. १४ फेब्रुवारी १९२०.