पं. जवाहरलाल मोतीलाल नेहरू ५२५
म्हणून घोषित करण्यात आले. महिला, अस्पृश्य व अल्पसंख्यांक याना समान दर्जा आणि समान संधी उपलब्ध होऊन भारतीय नागरिक समान एकसंघ बनविण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकण्यात आले. नेहरूंच्याच पुढाकाराने नियोजन मंडळाची स्थापना होऊन भारतात आर्थिक नियोजनाचे युग सुरू झाले. पहिली व दुसरी अशा दोन पंचवार्षिक योजना त्यांच्या कारकीर्दीत पूर्ण झाल्या. या योजनांमुळे देशातील औद्योगिकीकरणाचा पाया घातला गेला. नेहरूंनी समाजवादी समाजरचनेचे ध्येय काँग्रेस पक्षाला दिले. त्यांनी संपूर्ण राष्ट्रीयीकरणाचे धोरण न स्वीकारता सार्वजनिक क्षेत्राप्रमाणे खाजगी क्षेत्रालाही उत्तेजन दिले.
शिक्षण व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी देशात अनेक संशोधन संस्था व राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन केल्या. अणुशक्तीच्या विकासात त्यांना विशेष आस्था होती. त्यांच्याच प्रोत्साहनाने अणुसंशोधन केंद्र भारतात स्थापन झाले. अणुशक्तीचा उपयोग शांततामय कार्यासाठी व्हावा, असे त्यांचे ठाम मत होते. भारताला अणुयुगात आणण्याचे श्रेय पंडितजींनाच द्यावे लागेल.
चीनने भारताचा अक्साई चीनचा प्रदेश व्यापण्यास १९५८ पासूनच सुरुवात केली होती. चीनच्या मैत्रीवर पंडितजींचा विश्वास होता; परंतु या प्रश्नावर पुष्कळ वाटाघाटी होऊन अखेर तडजोड झालीच नाही आणि १९६२ च्या ऑक्टोबरमध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. पंडितजींना या घटनेचा फार मोठा धक्का बसला व त्यांची प्रकृतीही ढासळली. १९६३ साली त्यांना प्रथम मोठा आजार झाला व १९६४ च्या मे महिन्यात दिल्ली येथे त्यांचे देहावसन झाले.
नेहरूंचे ग्रंथलेखन इंग्रजीत असून ते कारागृहातच झालेले आहे. ग्लिम्पूसिस
ऑफ द वर्ल्ड हिस्टरी (१९३९), जवाहरलाल नेहरू : अन ऑटोबायग्राफी (१९३६)
व डिसूकव्हरी ऑफ इंडिया (१९४५) हे त्यांचे तीन ग्रंथ विशेष महत्त्वाचे मानले जातात. ग्लिम्पूसिस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी आणि डिसूकव्हरी ऑफ इंडिया हे ग्रंथ त्यांनी कारागृहांत लिहिले. डिसूकव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात नेहरूंनी अतिप्राचीन काळापासून सद्यःस्थितीपर्यंतचा संगतवार इतिहास संक्षिप्तपणे मांडलेला असून भारताच्या इतिहासातील प्रेरणांचे धागेदोरे जुळवून त्यांची तात्त्विक पार्श्वभूमी काय आहे, याचा शोध घेतला आहे. त्यातून भविष्यकाळ घडविण्याचे मार्गदर्शन लाभावे हा हेतू दिसतो; म्हणजे इतिहास कसा घडवावा [यासंबंधीचे ] मार्गदर्शन शोधणे, हे या ग्रंथामागील उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक घटनांची व व्यक्तींची शोधक चिकित्सा त्यात आढळते. या ग्रंथाचा [पूर्वार्ध ] [ब्रिटिशपूर्व ] कालखंडाचे ऐतिहासिक विवेचन हा आहे व उत्तरार्धात [इंग्रजी ] [अंमल, ] [जागतिक ] अधिभौतिक व वैचारिक क्रांती, दोन महायुद्धे, भारतीय-आर्थिक [व ] [राजकीय ] आंदोलने, काँग्रेसची वृद्धी, टिळक, गांधी, टागोर [वगैरेंची ] [थोरवी ] व कार्य,