पं. जवाहरलाल मोतीलाल नेहरू - Page 572

५२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदु-मुसलमान यांची दुही, समाजवादाचा उदय, स्वातंत्र्याची इष्टता व अपरिहार्यता, सामाजिक पुनर्रचना, राष्ट्रीय नियोजनव्यवस्था, धर्म, तत्त्वज्ञान, भौतिकशास्त्रे इ. अनेक विषयांचे तात्तिवक व ऐतिहासिक विवेचन केलेले आहे.

देशातील ' भारतरत्न ' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन १९५५ मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. आफ्रो-आशियाई देशांचे स्वातंत्र्य व संघटना, अलिप्ततावादाचे धोरण आणि पंचशील तत्त्व यांचा पुरस्कार करून त्यांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता यांसाठी अविरत प्रयत्न केले. त्यांची कृतज्ञतापूर्वक दखल घेण्यासाठी

भारत सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता यांसाठी नेहरू पुरस्काराची योजना कार्यान्वित करण्यात आली. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात अगदी पहिल्यापासून आदर्शवाद व वास्तवता यांच्यातील द्वंद्व कायम राहिले. त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाची मीमांसा या द्वंद्वांच्या आधारेही केली जाणे शक्य आहे; तथापि राष्ट्रीय दृष्टीने पाहता, महात्मा गांधींनी आपला वारस निवडून पंडितजीच्या कर्तृत्वावर जो विश्वास प्रकट केला होता, तो पंडितजींनी आपल्या कर्तृत्वाने सार्थ असल्याचे सिद्ध केले यात संदेह नाही. ' १

भारताने आपली राजमुद्रा आणि ध्वजावर अनुक्रमे अशोक स्तंभ व अशोक चक्र यांचा स्वीकार केला. पं. जवाहरलाल नेहरू भारतीय दृष्टीकोणातून यांचे औचित्य दर्शविताना ता. २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेत म्हणतात,

rN Now because I have mentioned the name of Asoka 1

should like you to think that the Asokan period in Indian history was essentially an international period of Indian history. It was not a narrowly national period. It was a period when India’s ambassadors went abroad to far countries and went abroad not in the way of an Empire and imperialism but an ambassadors of peace and culture and good will. (Cheers).

Therefore this Flag that I have the honour to present to you is not, I hope and trust, a Flag of Empire, a Flag of Imperialism, a Flag of domination over anybody, but a Flag of freedom not only for ourselves, but a symbol of freedom to all people who may see it. (Cheers) and wherever it may go and I hope it will go far, not only where Indians dwell as our ambassadors and ministers but across the far seas where it may be carried by Indian ships, whereever it may go it will bring a message, I hope, of freedom to those people, a message of comradeship, a message that India wants to be friends with every country of the world and India wants to help any people who seek freedom (hear, hear).”

(From the proceeding of the constituent Assembly to commemo- rate the 50th year of Indian Independence.) !

१ : मराठी विश्वकोश : पृ. ९४७-९५१. `

l : Chowdhury, Asoka 2300.