डॉ. आंबेडकर यांचे वतन बिल आणि त्याची कलमे - Page 573

परिशिष्ट-४२
डॉ. आंबेडकर यांचे वतन बिल
आणि त्याची कलमे

मुंबईचे गव्हर्नर यांच्या कायदे-कौन्सिलच्या, तारीख १९ माहे मार्च सन १९२८ च्या सभेंत जो आक्टाचा मसुदा पुढें मांडण्यास डॉ. बी. आर. आंबेडकर, एम. एल. सी. यांस परवानगी देण्यांत आली होती व ज्याचे पहिले वाचन मुंबईच्या कायदे- कौन्सिलांत पास झाले आहे व ज्याचे दुसरे आणि तिसरे वाचन व्हावयाचे आहे त्या आक्टाचा मसुद्याचे मराठी भाषांतर ता. ७ जून १९२८ च्या सरकारी ग्याझेटांत प्रसीद्ध झाले आहे. त्याचा उतारा आमच्या वाचकांच्या माहितीसाठी आम्ही खाली देत आहोत.

सन १९२८ चा मुंबईचा आक्टाचा मसुदा नंबर १२ वा

सन १८७४ चा वंशपरंपरेचे हुद्याविषयींचा मुंबईचा आक्ट आणखी सुधारण्याबाबत आक्टाचा मसुदा.

ज्याअर्थी, वंशपरंपरेचे हुद्याविषयीचा मुंबईचा आक्ट यापुढें सांगितलेल्या रीतीनें सुधारणें इष्ट आहे ; आणि ज्याअर्थी हिंदुस्थान सरकारसंबंधी आक्टाच्या ८०-क कलमाअन्वयेंची आलीजा गव्हर्नर यांची आगाऊ मंजुरी मिळालेली आहे ; त्याअर्थी, यावरून खालीं लिहिल्याप्रमाणें कायदा ठरविण्यांत येत आहे :-

१. या आक्टास सन १९२८ चा वंशपरंपरेचे हुद्याविषयींचा मुंबईचा sac सुधारण्याबाबत आक्ट असें म्हणावें.

२. सन १८७४ चा मुंबईचा see ३ रा याच्या ९ व्या कलमाची सुधारणा.--९ व्या कलमाच्या (१) ल्या रक्कमेंत '' वहिवाटदाराचा मेहनताना म्हणून लावून दिलेले असेल किंवा नसेल “ या मजकुराच्या बदला “ वहिवाटदाराचा मेहनताना म्हणून लावून दिलेलें नसेल Sl मजकूर दाखल करावा;

३. सन १८७४ चा मुंबईचा आक्ट तिसरा यांत नवीन कलम ९ अ दाखल करणें.--९ व्या कलमानंतर, पुढील मजकूर दाखल करावा, तो येणेप्रमाणे :--

“eat (१) कोणतेंहि वतन किंवा त्याचा कोणताहि भाग किंवा वहिवाटदाराचा मेहनताना म्हणून लावून दिलेलें त्याचें कोणतेंहि उत्पन्न, त्याच वतनाचा वतनदार नाहीं अशा कोणत्याही मनुष्याच्या मालकींत किंवा कायदेदार कबज्यांत कोणत्याही ब्रिटीश कोर्टाच्या हुकुमनाम्याखेरीज किंवा हुकुमाखेरीज किंवा तो बजावल्याखेरीज

ड्ब्ल्यू-२०७३-३४ अ