५२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
इतर रीतींने व कलेक्टराचे मंजुरीवांचून व रेव्हेन्यू. दप्तरांत मालकी त्याचे नावावर दाखल झाल्यावाचून, सन १८७४ चा वंशपरंपरेचे हुद्याविषयींचा मुंबईचा आक्ट अंमलांत येण्याचे तारखेपूर्वी गेलें असेल तेव्हां कलेक्टरानें सदरहू प्रकारचा दुमाला रद्दबातल आहे असा ठराव केला पाहिजे व त्याने त्या वतनावर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा त्याच्या कोणत्याही उत्पन्नावर ज्या वतनदाराचा पूर्वी हक्क होता त्या वतनदाराचें तें वतन किंवा वतनाचा तो भाग किंवा वतनाचें तें उत्पन्न अशा हुकुमाचे तारखेपासून होईल असा हुकुम केला पाहिजे व त्याप्रमाणें त्याचें कोणतेंहि उत्पन्न वसूल करून सदरहू प्रकारचे वतनदारास दिलें पाहिजे.
(2) जर वतनाचा सदरहू प्रकारचा भाग जमीन असेल, तर, कलेक्टरनें, ती जमीन वतनदाराकडे तबदील करण्याबद्दल हुकूम केला पाहिजे. “
४. सन १८७४ चा मुंबईचा sree ३ रा याच्या १५ व्या कलमाची सुधारणा.--कलम १५ रक्कम १ यास पुढील विशेष ठराव ज्यास्त जोडावा, तो
येणेप्रमाणे :--
“ मात्र असें ठरविण्यांत येत आहे, कीं, या आक्टाच्या ६३ व्या कलमाच्या अर्थाप्रमाणें वंशपरंपरेचा हुद्दा धारण करणाऱ्या, वतनी जमिनी कबज्यांत असलेल्या वारचा दतनदारांच्या संबंध समूहाच्या किंवा त्यांच्यातील बहुसंख्य लोकांच्या, अशी नोकरी करण्याच्या आपल्या पात्रतेपासून निरंतर मुक्त केलें जाणें-जर अशी मुक्त केलें जाण्याविषयींची त्यांची इच्छा कलेक्टराकडे लेखी अर्जी करून कळविण्यात येईल तर--मर्जीवर असलें पाहिजे, व जर अशा जमिनीवरील सर्व्हची पूर्ण आकारणी भरण्याचे ते कबूल करतील तर त्यांस त्यांनी धारण केलेल्या जमिनी कबज्यांत ठेवण्याचें चालू ठेवण्याचा हकक असला पाहिजे. “
५. सन १८७४ चा मुंबईचा आक्ट ३ रा याच्या १९ व्या कलमाची सुधारणा.--१९ व्या कलमांतून “ व ती नक्त किंवा ऐनजिनसी द्यावी हें ठरविण्याचा “ हे ५ शब्द गाळावे.
६. सन १८७४ चा मुंबई आक्ट ३ रा यांत नविन कलमें १९-अ, १९-ब, १९-क, व १९-ड ही दाखल करणें.--१९ व्या कलमानंतर, पुढील कलमें दाखल करावीं, ती येणेंप्रमाणें :--
१९-अ. ज्यांची वतनी मिळकत म्हणजे ऐनजिनसी वसूल करण्याचा हक्क ही असते असा वारचा वतनदारांचा संबंध समूह किंवा त्यांच्यातील बहुसंख्य लोक, जेव्हां अशा हक्काचे पैशाच्या पट्टीच्या रूपांत रूपांतर करण्याबद्दल कलेक्टराकडे अर्जी करतील, तेव्हां कलेक्टरानें, त्याचें, त्याबरोबरीच्या पैशाच्या पट्टीच्या रूपांत रूपांतर केलें पाहिजे.
डन्ल्यू-२०७३-३४ ब