डॉ. आंबेडकर यांचे वतन बिल आणि त्याची कलमे - Page 575

डॉ. आंबेडकर यांचे वतन बिल ५२९

१९-ब. जेव्हां अशा प्रकारच्या ऐनजिनसी वसूल करण्याच्या हक्काचे त्याबरोबरीच्या पैशाच्या पट्टीच्या रूपांत रूपांतर करण्यांत आलें असेल, तेव्हां सबंध असलेल्या वारचा वतनदारांच्या संबंध समूहास किंवा त्यांच्यांतील बहुसंख्य लोकांस, तो, तो देण्यास जे पात्र असतील त्यांजकडून वसूल करून घेण्याबद्दल कलेक्टराकडे अर्जी करण्याचा अधिकार आहे. नंतर कलेक्टरानें तो जमीन महसुलाबरोबर व त्याचा भाग म्हणून वसूल केला पाहिजे, व त्याबाबद हक्कदार असलेल्या त्या वतनदारांस सरकारी तिजोरीतून तो देण्याबद्दल फर्माविलें पाहिजे.

१९-क. जेव्हां ऐनजिनसी वसूल करण्याचा असा हक्क, रयत व सरकार या दोघांचीहि नोकरी करण्याबद्दल संयुक्त मोबदला समजण्यांत येत असेल अशा बाबतींत, ऐनजिनसी वसूल करण्याबददलच्या ज्यांच्या हक्कांचें पैशाच्या पट्टीत रूपांतर करण्यांत आलें असेल अशा वारच्या वतनदारांच्या सबंध समूहास किंवा त्यांच्यातील बहुसंख्य लोकांस, सदरहू पैशाच्या पट्टीपैकीं, सरकारची नोकरी करण्याबद्दल त्यांस किती पट्टी येणें आहे व रयतांची नोकरी करण्याबद्दल त्यांस किती पट्टी येणें आहे तें ठरविण्याबाबत कलेक्टराकडे अर्जी करण्याचा अधिकार आहे. नंतर कलेक्टराने अशा प्रकारचा निवाडा दिला पाहिजे, व त्याचा निकाल अखेरचा समजला पाहिजे.

१९-ड-१९-क. कलमांत उल्लेख केल्या प्रकारच्या निवाड्यासाठीं ज्यांनी अर्जी केली असेल अशा, वारच्या वतनदारांच्या सबंध समूहाच्या किंवा त्यांच्यातील बहुसंख्य इसमांच्या, रयतांची कोणतीही नोकरी करण्याचे नाकारणें, मर्जीवर असलें पाहिजे. मात्र या बाबतीतील आपला निर्णय त्यांनी कलेक्टरास लेखी 'कळविलेला असला पाहिजे. अशाप्रकारे मर्जीप्रमाणे नोकरी करण्याचें नाकारल्याचे बाबतींत, अशाप्रकारें मर्जी चालविणारे (नोकरी करण्याचें नाकारणारे) वतनदार रयतांची नोकरी करण्याबद्दल त्यांस येणें असलेल्या पैशाच्या पट्टीच्या तेवढ्या भागास मुकतील.

७. सन १८७४ चा मुंबईचा आक्ट ३ रा याच्या २१ व्या कलमाची सुधारणा.--२१ व्या कलमांतील ' त्या मुदतीचे ' या शब्दांच्या ऐवजी, ' त्या दहा वर्षाहून जास्त नाहीं अशा मुदतीचे ' हे शब्द, दाखल करावे.

८. सन १८७४ चा मुंबईचा आक्ट ३ रा याच्या ८३ व्या कलमाची सुधारणा.--८३ व्या कलमाच्या बदला पुढील कलम दाखल करावें, तें

येणेप्रमाणे :---

'" ८३. हा आक्ट पास झाल्यानंतर, ५८ वे कलमांत इतर रीतीचा ठराव केला आहे तो खेरीज करून, सरकारनें, कोणत्याहि वंशपरंपरेच्या हुद्याचीं जीं कर्तव्यकर्मे असतील तीं निर्दिष्ट करणाऱ्या कानू केल्या पाहिजेत.