परिशिष्ट-४३
जंगली जाती
मुंबई इलाख्यांतील अस्पृश्य व जंगली जातींची चौकशी करण्यासाठीं कमिटी.
मुंबई कौन्सिलच्या गेल्या अधिवेशनांत पास झालेल्या डॉ. सोलंकी यांच्या ठरावानुसार मुंबई इलाख्यांतील अस्पृश्य व भिल्ल, गोंड वगैरे जंगली जाती यांच्या सामाजिक, सांपत्तिक व शिक्षणविषयक गाऱ्हाण्यांची चौकशी करण्यासाठी खालील कमिटी मुंबई सरकारनें नेमली आहे.
अध्यक्ष :-मि. ओ. एच्. बी. स्टाट, आयू. सी. एस्.
सभासद :-रा. सा. जे. के. मेहता.
डॉ. पी. जी. सोलंकी
डॉ. भिमराव आंबेडकर
श्री. एल्. एम्. देशपांडे
श्री. पंडिताप्पा चिकोडी
मेजर बू फूट, मुक्तीफौज, मुंबई
श्री. अमृतलाल ठक्कर
श्री. एन्. ए. थोरात
श्री. डी. ए. जानवेकर
कमिटीच्या चौकशींचें काम ता. १५ पासून सुरूं झालें. कमिटीने आपला रिपोर्ट एक वर्षाचे आंत करावयाचा आहे.
या कमिटीकडे कोणाला कांहीं सूचना पाठवायच्या झाल्यास, त्या डॉ. आंबेडकरांकडे पाठवाव्या, म्हणजे त्यांची योग्य ती व्यवस्था होईल.
बहिष्कृत भारत : ता. ७ डिसेंबर १९२८.