परिशिष्ट-४४
नाशिक जिल्हा हिंदु समाज समता संघ.
या संघाची स्थापना विजयादशमीच्या दिवशीं झाली असून, तिचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत
(१) स्पृश्य व अस्पृश्य यांमध्यें जुन्या रूढीस अनुसरून जो भेदाभेद मानला जातो, तो दूर करणें.
(२) अस्पृश्य लोक हे हिंदूच असल्यामुळे हिंदूंचे सर्व हक्क त्यांना आहेत, असें लोकांचे नजरेस आणून देणें.
(३) शक्य ती खटपट करून, त्यांस समसमान दर्जा प्राप्त करून देऊन, असलेली असमानता नाहींशी करणें.
वरील उद्देश पार पाडण्याकरितां संघाच्या सभासदांनी सध्यां खालील कामें पार पाडण्याचें योजिलें आहे.
(१) भंगी आळींत असलेल्या wart देवळांत निदान महिन्यांतून एकदा तरी सर्व हिंदूंनी एकत्र प्रार्थना करणे.
(२) वारंवार सहभोजनांचे कार्यक्रम घडवून आणणें.
(३) जिल्ह्यांतील सर्व शाळा, देवालयें, व इतर सार्वजनिक संस्थांमध्ये समाजाची समता राहील अशा तऱहेने खटपट करणें.
संघाची घटना.
अध्यक्ष :-श्री. आर. जे. वैद्य.
उपाध्यक्ष :-श्री. के. एस्. दिक्षित.
सेक्रेटरी :-श्री. जी. व्ही. पोतनीस.
श्री. भा. कृ. गायकवाड.
खजिनदार :-श्री. व्ही. पी. साठये.
बहिष्कृत भारत: ता. ७ डिसेंबर १९२८.