परिशिष्ट-४५
बळीचे बलाढ्य सुराज्य फसवून का घेतले ?
बळी राजा आणि वामन यांच्या विषयी ज्ञानकोषात खालीलप्रमाणे माहिती दिली आहे :
" वामन--चालू मन्वंतरात सातच्या पर्यायांतील त्रेतायुगात कश्यपापासून आदितीच्या ठायी झालेल्या विष्णुचा अवतार.”
` “'बलि--प्रल्हादपुत्र विरोचनाचा मुलगा हा इंद्रपदासाठी शंभरावा यज्ञ करीत असतां विष्णूने वामनाचें रूप घेऊन याच्या जवळून त्रिपाद भूमीचें दान मिळविले व यास पाताळात घातलें. हा सप्तचिरंजींवा पैकी एक आहे.'?
वरील वामनाच्या तथाकथित कृतीचे सद्सद्विवेक बुद्धीने विचक्षणा करताना महात्मा फुले स्वतःच प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरे खालीलप्रमाणे देतात :
धों.--तर मग आदिनारायणानें बळीस पाताळी घालण्याकरितां वामनाचा अवतार घेंतला. त्या वामनाने भिकाऱ्याचें सोंग घेऊन बळीराजास फसवून,त्यापासून तीन पाउलें पृथ्वी मागून घेतली. नंतर त्यानें Parad सोंग टाकून इतका मोठा अगडबंब मनुष्य बनला कीं, त्यानें एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आपल्या दोन्हीं पाऊलांत आटवून बळीराजास विचारलें की आतां मीं तिसरे पाऊल कोठे ठेवावें ? नंतर बळीराजाने लाचार होऊन त्या अगडबंब्यास असें उत्तर दिलें कीं, तू आतां आपले तिसरें पाऊल माज्या मस्तकावर ठेव. असें म्हणतांच त्या बंब्यानें बळीराजाच्या मस्तकावर आपलें तिसरें पाऊल ठेवून बळीस पाताळी घालून आपला करार पुरा करून घेतला, असें त्याचे उपाध्यांनी भागवत वगैरे इतिहासांत लिहून ठेविलें आहे, तें सर्व तुमच्या या हकीकतीवरून खोटें आहे असें सिद्ध होतें. तर याविषयीं तुमचा काय अभिप्राय आहे तो कळूं द्या.
जो.--आतां यावरून तूंच विचार करून पहा कीं, जेव्हां त्या बंब्याने आपल्या दोन पावलांत एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटविलें, तेंव्हा त्या बंब्याच्या पहिल्या पावलाखालीं कित्येक गावें चेंगरून लयास गेलीं असतींल, नाहीं बरें?
१ : श्री. व्यं. केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोष, भाग २० वा. पृ. १४८.
२ : तत्रैव, भाग १८ वा. पृ. ४६.