बळीचे बलाढ्य सुराज्य फसवून का घेतले ? - Page 580

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५३४

दुसरे पाऊल आकाशांत ठेवितेवेळीं तेथें दुसरें असें कीं, त्या बंब्याने जेव्हां आपले

अतिशय दाटी झाल्यामुळे कित्येक ताऱ्यांचा एकमेकांवर आदळून चुराडा झाला

पावलांत जर असेल कीं नाहीं बरें! तिसरें असें कीं, त्या बंब्यानें आपल्या दुसऱ्या सर्व आकाश आटविलें तर त्याचें कंबरेपासून aed धड कोठें राहिले असावे? कारण मनुष्यांचें दुसरे पाऊल फार झालें तर त्यांच्या बेंबटापर्यंत ऊच आकाशांत

Wed शकतें. यावरून त्या बंब्याचें कंबरेपासून त्यांच्या मस्तकापर्यंत आकाश

उरलें असेल, त्यात अथवा त्या बंब्याने आपल्याच माथ्यावर आपलें तिसरें पाऊल ठेवून आपला करार पुरा करून घेण्यांचे एकिकडेस ठेवून त्याने केवळ दगेबाजी करून आपलें तिसरें पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळी घातले, हें कसें ?

धों.--काय तो dan आदिनारायणाचा अवतार ना? आणि त्याच्यानें अशी ढळढळीत दगलबाजी कशी करवली? अशा लबाडास आदिनारायणाचा अवतार म्हणणाऱ्या इतिहासकर्त्यास धिःक्कार असो. कारण त्यांच्याच लेखांवरून वामन हा कपटी, घातकी आणि कृतघ्न होता; असें सिंद्ध होतें, की ज्यानें आपल्या

दात्यास कपटानें पाताळीं घातलें.

जो.--चवथें असें कीं, त्या बंब्याचें डोकें जेव्हां आकाशापलीकडेस स्वर्गात ऊच गेलें असेल, तेव्हां त्यास तेथून बळीस फारच मोठयानें ओरडून विचारावें लागलें असेल कीं, आता माझ्या दोन पावलांतच एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटले, यास्तव आतां मीं माझें तिसरें पाऊल कोठे ठेवून आपली कबुलायत पुरी करून घ्यावी ? कारण आकाशांतील त्या बंब्याचें मुख आणि पृथ्वीवरील बळीराजा यांमध्ये अनंत कोसांचें अंतर पडलें असेल; आणि त्यापैकी रशियन, Ga, इंग्लिश आणि अमेरिकन वगैरे लोकांपैकी एकाही मनुष्यास त्या भाषणापैकी एक शब्दसुद्धा ऐकूं गेला नाहीं, हें कसे? व त्याप्रमाणें पृथ्वीवरील मानव बळीराजाने त्या बंब्यास उत्तर दिलें कीं, तूं आपलें तिसरें पाऊल माझ्या मस्तकावर ठेव. हें तरी त्या

बंब्यास कसें ऐकू गेलें असेल ? कारण, बळी कांही त्यासारिखा विचित्र प्राणी बनला नव्हता. पाचवे असें कीं, त्या बंब्याच्या भारानें ही पृथ्वी रसातळात गेली

नाही, हे मोठें आश्चर्य होय.

धों.--नाहीं तर आपण हे दिवस कोठून पाहिले असते बरें? त्या बंब्यानें काय काय खाऊन आपला जीव वांचविला असेल ? अहो, तो बंब्या मेला असेल तेव्हा त्याच्या त्या अगडबंब मढ्यास स्मशानांत नेण्याकरितां चौघे खांदेकरी तरी कोठून मिळाले असतील? कदाचित त्यास जागच्या जागींच लाकडे रचून जाळलें असेल म्हणावें, तर त्यास जाळण्यापुरतीं ates किंवा गोवऱ्या तरी कोठून मिळाल्या