स्वराज्याचे मातापिता - Page 59

स्वराज्याचे मातापिता

जसा ब्रह्मदेवाला आपण सृष्टि उत्पन्न केल्याबद्दल किंवा विश्वामित्राला मी प्रतिसृष्टीचा विधाता आहे याबद्दल अभिमान वाटावा तसाच मनुष्यकोटींतील प्रत्येक प्राण्यास अमुक एका गोष्टीचें मूळ कारण आपण आहों याबद्दल अभिमान वाटावा हें साहजिकच आहे. स्वराज्यवादीयांत हिंदुस्थानास मिळालेल्या स्वराज्याचें

आदिकरण कोण यासंबंधाचा जो मोठा लढा उत्पन्न झाला आहे तो या न्यायास

धरूनच आहे. लोकमाता बिझांट, लो. टिळक आणि लो. शास्त्री इत्यादि आपापल्या परी स्वराज्याच्या विधात्याची जागा बळकावू पहात आहेत. "aN झालियाचे अवघेचि सांगाती” या संतोक्तीच्या दृष्टीने लोक टिळकांची धडपड अगदीं विपरीत आहे. दिलेलें स्वराज्य अगदीं निराशाजनक व टाकाऊ आहे असें जर लो. टिळक म्हणतात तर असल्या विद्रुप मुलाचा मीच बाप असें शाबीत करून घेण्यांत काय अर्थ आहे कोण जाणे? वासनेवरून शीलाची कल्पना होते म्हणतात; लोकमान्यांचे शील तर कमी दर्ज्याचे नसेल ना? लोकमाता बिझांट व लो. शास्त्री ह्यांची गोष्ट मात्र निराळी. त्यांना हें मूल आवडते. म्हणून त्याला मांडीवर घेण्याचा त्यांचा प्रयत्न एवढा अश्लाघ्य नाहीं, तरी पण या मुलाचे

आपण मातापिता आहों असें मानणें हा त्यांचा भ्रम आहे.

आमच्या मतें स्वराज्याचे बीजारोपण करणारांच्या यादींत स्वतः होऊन घेतलेल्या पुढारी या टोपण नांवाच्या ओझ्या (?) खालीं चिरडून गेलेल्या एकाहि माणसाची गणना करितां येणार नाहीं. ओरड करून मिळविण्याइतकी स्वल्प स्वराज्याची देणगी नव्हे. कितीही ओरड झाली असली तरीपण त्यामुळे स्वराज्य मिळालेंच पाहिजे होतें असें कांहीं निश्चित होत नाहीं. स्वराज्याच्या देणगींत सत्तेच्या शहाणपणाचा जेवढा भाग आहे तेवढा आरडाओरड करणारांचा खास नाहीं. स्वराज्य देत नाहीं असें जर म्हटलें असतें तर ब्रिटिशांच्या हातून तें हिसकावून घेण्यास कोणाची प्राज्ञा झाली नसती हें निर्विवाद आहे. कारण सामाजिक बाबतींत ब्राह्मणेतरांना गुलामगिरीत ठेवून ब्राह्मणांना जशी पेशवाई गाजवतां आली, तशीच किंबहुना तिच्याहिपेक्षा जास्त दरारा ठेवून हिंदवासीयांना स्वराज्य दिल्याखेरीज ब्रिटिश लोकांना हुकमत गाजवतां आली असती. पणते तसें करूं इच्छीत नाहींत. याचा अर्थ त्यांच्यावर दडपण आहे असें नव्हे तर त्यांत