बळीचे बलाढ्य सुराज्य फसवून का घेतले ? - Page 581

बळीचे बलाढ्य सुराज्य फसवून का घेतले ? ५३५ असतील ? बरें तसल्या मढ्यास जाळण्यापुरतीं लांकडें मिळालीं नसतील म्हणावें तर त्याचा जागचे जागींच कोल्ह्याकुत्रांनी खाऊन भंडारा केला असेल काय? सारांश, भागवत वगैरे सर्व ग्रंथांवरून जर सदरीं लिहिलेल्या शंकांचे निवारण होत नाहीं, तर उपाध्यांनीं मागाहून संधी पाहून एकंदर सर्व मूळच्या दंतकथांवरून हे सर्व ग्रंथ केले असावेत असें सिद्ध होतें.

जो.--बाबा! तूं तें भागवत एक वेळ वाचून पहा, म्हणजे तुला त्यापेक्षां इसापनीति बरी वाटूं लागेल.

महात्मा फुले यांनी धर्मग्रंथात जे बळी आणि वामन यांच्या विषयी अंघश्रध्दायुक्त कथानक दर्शविले आहे त्याचे वरील प्रमाणे मुद्देसूद आणि वैज्ञानिक दृष्ट्या खंडण करताना वामनाने बळीच्या राज्यावर जे आकस्मिकरित्या आक्रमण केले त्याचे वर्णन केले आहे. ते म्हणतात,

'बळीच्या राज्यात संपुर्ण महाराष्ट्र आणि अयोध्या जवळ काशीक्षेत्राचे आसपास असलेले क्षेत्रे समाविष्ट होते. वामन आपल्या सर्व फौजेसहित बळीच्या राज्यांत एकदम शिरून तो बळीच्या मुख्य राजधानी जवळ येऊन भिडला. बळीला वामनाने केलेल्या आकस्मिक आक्रमणाची कल्पना नसल्यामुळे तो भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून वद्य अमावस्ये पावेतो आपल्या तुटपुंज्या फौजेसहित लढला. त्याला आपल्या सर्व खंडातील फौजा युद्धासाठी बोलविण्यास वेळ सुद्धा मिळाला नाही. परिणामी आश्विन शुद्ध अष्टमीस रात्री बळी राजाचा पराजय झाला. बळी रणांगणी पडल्यावर बाणासुराने वामनाशी एक दिवसभर हालिशीं हाल देऊन मोठ्या निकराने लढला. नंतर त्याने आश्विन शुद्ध नवमीस रात्री आपली उरलेली फौज बरोबर घेऊन पळून गेला.

TORTS लोक आश्विन शुद्ध दशमीस रात्री आपल्या घरोघर गेले, तेव्हां

त्यांच्या स्त्रियांनी पुढें दुसरा बळी येऊन देवाचें राज्य स्थापिल, याविषयी भविष्य जाणून त्यांनी आपल्या उंबच्यात उभ्या राहून त्यांस ओवाळून अशा म्हणाल्या कीं, ““ इडापिडा (द्विजांचा अधिकार) जावो आणि बळीचें राज्य येवो.” त्या दिवसापासून आजदिवसपर्यंत शेंकडों वर्षांची वर्षे लोटली, तथापि बळीच्या राज्यांतील कित्येक भागांमध्ये क्षत्रीय वंशांच्या स्त्रियांनी दरवर्षी आश्विन शुद्ध दसमीस संध्याकाळी आपापल्या पतीस व पुत्रास ओवाळून पुढें येणाऱ्या बळींचे राज्य यावे म्हणून इच्छिण्याचे अद्याप सोडिले नाही.

मागाहून बळीराजाने बोलावलेले सरदार आपापल्या फौजा घेऊन आश्विन शुद्ध चतुर्दशीस बाणासुरास येऊन मिळतांच बळीच्या राज्यातील एकंदर सर्व विप्र आपले जीव घेऊन वामनाकडे पळून गेले. त्याने आपल्या एकंदर सर्व विप्रांस