बळीचे बलाढ्य सुराज्य फसवून का घेतले ? - Page 582

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५३६

जमा करून पुढें बाणासुरापासून आपला बचाव कसा करून घ्यावा म्हणून

जागर फांसे टाकीत बसला. आश्विन शुद्ध पौर्णिमेस (कुजागरी) सर्व रात्रभर

करून नंतर बाणासुराने वामनावर एकदम हल्ला करून त्याचा अगदी मोड त्याजवळचें सर्व लुटून घेतले. नंतर त्यास त्यांच्या सर्व लोकांसहित प्रथमतः त्याने आपल्या मुलुखांतून जरजर करून हिमालय पर्वतावर हाकलून

दिले.

यावरून येथील एकंदर सर्व आबालवृध्द स्त्रियांस जो काय आनंद झाला की त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितियेस आपापल्या बांधवांस यथाशक्ति भोजन घालून तृप्त केल्यानंतर त्यांनी त्यांस ओवाळून ''इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो “ अशी त्या येणाऱ्या बळीची आठवण दिली.

पद्मपुराणात बळी विषयी खालील प्रमाणे उल्लेख आहे.

बलिनमि महादैत्यो देवारिरपराजतः |

धर्मेणयश साचैवप्रजा संरक्षणेच ||

तस्मिन्‌ शासति राज्यंतु त्रैलोक्या हतकष्टकम्‌ ।

नारयो व्याधयोवाडपि नाधयोया कथं च न ॥

अनावृष्टिरधर्मो वा नास्ति शब्दो न दुर्जनः ।

- स्वप्ने ऽ पि नैव दश्यते बलौ राज्य प्रशासति ॥

अर्थात, बळी नावाचा महादैत्य हा देवांचा शत्रु व तो अपराजेय होता. धर्म, यश व फ्रजा रक्षणात तो अत्यंत सतर्क होता. बळीच्या राज्यात कुणालाही दुःख नव्हते, कुणी कुणाचा शत्रू नव्हता, कुणाला कशाची चिता नव्हती. त्याच्या शासन काळात तिन्ही लोकांचे दुःख, कष्ट दूर झाले होते. त्याच्या राज्यात पाण्याची कमतरता नव्हती, गुंडगिरी, बदमाशी नव्हती आणि स्वप्नात देखील असे प्रकार कुणाला दिसत नव्हते.

वैदिक धर्म खंड (भाग-१) या पुस्तकात संस्कृतचे ब्राह्मण विद्वान श्री. दा. सातवळेकर यांनी भागवत पुराणाच्या आधारे लिहिलेल्या 'वामनावताराचा संदेश' या प्रकणात बळी विषयी म्हटले आहे.

बळीच्या राज्यात कोणास उघड त्रास होत नव्हता. सर्वांना सारखा न्याय

मिळत होता. कोणताही असूर पूर्वीप्रमाणे आर्यदिका ला हाणमार करत

नव्हता.

१: महात्मा फुले : समग्र वाङ्मय, सुधारित पाचवी आवृत्ती-२८-११-१९९१ पृ. १५०-१५५.