बढीचे बलाढ्य सुराज्य फसवून का घेतले ? ५३७
हे सर्व असूनही बढीचा द्वेष इथले आर्यवादी आजही करतात तो का? कारण बळी हा आर्य वंशीय नव्हता. तो असूर होता. त्याच्या राज्यांत समानता होती. आर्य ब्राह्मणांनाही खायला प्यायला कमी नव्हते. तथापि "ऐश्वर्य, यश व जागा या देवांना वा आर्यांना न मिळता त्या सर्व दैत्यांना मिळत असत.' भौतिक सुखापेक्षाही सत्तास्थाने महत्त्वाची आहेत आणि त्याशिवाय सुख कुचकामाचे असा वामनाने बळीचा पराजय करून संदेश दिला.
बळीचे राज्य सुराज्य होते यात शंका नाही. पण स्वराज्याच्या बद्दल ते कोणीही स्वीकारणार नाही व कोणाही समंजस माणसाने ते तसे स्वीकारू नये, हे मोठे तत्त्व वामनावताराने सांगितले म्हणून जग असे पर्यंत सर्व राजनीतिज्ञ-पुरुष वामनाचे गोडवे गातील यात शंका नाही."
१: उद्घृत : समतेसाठी बहुजन संघर्ष, विशेषांक १९८६.