श्रीक्षेत्र काशी येथील ब्राह्मण महासंमेलनापुढे चर्चेसाठी आलेली प्रश्नावली व तिची धर्मगुरूंनी दिलेली निर्णयात्मक उत्तरे - Page 585

श्रीक्षेत्र काशी येथील . . . .. . . दिलेलीं निर्णयात्मक उत्तरे ५३९

७. विधवाविवाह व विवाहसंबंधपरित्याग शास्त्रदृष्ट्या योग्य आहे कीं अयोग्य आहे कीं निंद्य आहे ?

८. अस्पृश्य वर्गाचे हें जातितः आहे कीं कर्मतः आहे ?

९. म्लेंच्छ व अंत्यज यांचा स्पर्श, सभेत प्रवेश, विहिरीचें पाणी घेणें व देवळांत प्रवेश या गोष्टींत इतरांपेक्षां तारतम्य राखणें योग्य कीं अयोग्य ? जर तें योग्य असेल तर तें कोणत्या प्रकारचें राखावें ?

१०. भागवतधर्मदीक्षा ही (याच जन्मीं) उच्च जातीला प्राप्त करून देणारी आहे कीं नाहीं ?

११. यवनादि जाति ह्या काय कर्माने झाल्या आहेत अथवा जन्मानें झाल्या आहेत ?

१२. भागवतधर्मदीक्षेविषयीं जातिविशेष हा प्रतिबंधक आहे कीं नाही ?

१३. शूलपाणि वगैरे ग्रंथकारांच्या व्यवस्थेप्रमाणें देवलस्मृतीचें प्रामाण्य स्वीकारावें कीं नाहीं ?

१४. म्लेंच्छसंसर्गानें येणाऱ्या प्रायश्चित मर्यादा किती कालपर्यंत ?

१५. एक संवत्सरपर्यंत म्लेंच्छाशीं संसर्ग करणाऱ्याच्या व त्यापेक्षां अधिक काल सर्व प्रकारच्या म्लेंच्छांबरोवर संसर्ग करणाऱ्यांच्या प्रायश्चिताविषयीं व व्यवहाराविषयीं सारखेपणा आहे कां कांही भिन्नता आहे ?

१६. व्रात्यसंस्कार किती पिढ्यापर्यंत शास्त्राने करितां येतो ?

१७. जाति ही या जन्मांतील कर्माने प्राप्त होतें व ती अनिश्चित असते कां जन्माने प्राप्त होते व निश्चित असते ?

उत्तरे

१-३. स्त्रियांच्या विवाहविषयीं गर्भस्थितीपासून आठवें वर्ष हा मुख्य काल होय. नववें व दहावें वर्ष हा मध्यम काल. नंतर ऋतुदर्शनापर्यंत गौण काल

आणि ऋतुदर्शनानंतरचा काल सर्व प्रकारें निंद्य होय.

२. चालूं परिस्थितीला अनुसरूनहि आठ वर्षापासून तों ऋतुदर्शन होईपर्यंत स्त्रियांचा विवाह करूं नये असा कायदा करणें सर्वथा अयोग्य होय.