श्रीक्षेत्र काशी येथील ब्राह्मण महासंमेलनापुढे चर्चेसाठी आलेली प्रश्नावली व तिची धर्मगुरूंनी दिलेली निर्णयात्मक उत्तरे - Page 586

५४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

धर्मकार्यानर्हत्त्वविषयीं समजावें ४. वृषलीत्वबोधक वचनांचें तात्पर्य

(ता. २०/११/२८ च्या केसरीत प्रायश्चित्तानेंहि त्याची निवृत्ति होत नाहीं, असें छापलें आहे तें निर्मूल आहे. )

५. पोटजातींत परस्पर विवाह करणें हें निंद्य होय.

६. धर्मज्ञ मन्वादिक होत. ते सुद्धां स्वतंत्रपणें धर्मपरिवर्तन करण्यास समर्थ

नाहींत.

७. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या त्रैवणिकांतील विधवाविवाह व विवाहसंबंध-परित्याग ह्या गोष्टीं सर्व प्रकारें निषिद्ध होत.

८. म्लेंछ, चांडाल इत्यादिकांचें अस्पृश्यत्व हें जातितः होय व त्यांच्यांत समाविष्ट झालेल्यांचें कर्मामुळें होय.

९. धर्मदृष्टींनें पाहिलें तर प्रस्तुतच्या म्लेंछांना व चांडालांना अस्पृश्यत्व, देऊळ, सभा वगैरेत प्रवेशानर्हत्व व त्यांच्या पात्रांनी स्पृष्ट झालेल्या कूपोदकांचें अग्राह्यत्व या गोष्टी शास्त्राने सर्वथा सांगितल्या आहेत. या शास्त्रांज्ञांचें रक्षण करणें अवश्य आहे.

१०. मंत्रग्रहणादिस्वरूपी भागवतदीक्षा ही या जन्मामध्यें उत्कृष्ट जातीची प्राप्ति करून देणारी नसते.

११. यवनादि जाति ह्या जन्मानेंच सिद्ध आहेत.

१२. ओंकाररहित अशा कांहीं नाममंत्रांविषयीं जातिविशेष प्रतिबंध नाहीं. (याला सर्व आचार्यांची संमति आहे.) कांहीं विशिष्ट धर्मविषयक जे मंत्र आहेत ते सोडून अन्यत्र [ जातिविशेष at] प्रतिबंधक आहेच. [dena संप्रदायी श्रीवैष्णवांचें असें मत आहे. |

१३. शूलपाणि यानें स्वीकारलेल्या व्यवस्थेप्रमाणें देवलस्मृतीला प्रामाण्य मानण्याविषयीं कांहीं बाधक नाहीं.

१४. बलात्काराने दास्य करावयास लावलेल्या पुरुषास तीन वर्षेपर्यंत म्लेंछाचा संसर्ग घडेल तर मन्वादिकांनी सांगितलेल्या व्यवस्थेप्रमाणें प्रायश्चित्तानें शुद्धि होते ही गोष्ट सर्व निबंधकारांना मान्य आहे. इच्छेनें म्लेंच्छस्त्रीबरोबर "एकवार संग घडेल तर पातित्व येतें. एका पात्रांत भोजन करणें असा विशेष संसर्ग स्वेच्छेनें चोविस वेळां घडेल तरीडी पातित्यच येते. एका पंक्तीत बसून भोजनादिक स्वेच्छेने केलें तर एक वर्षाने पतित होतो.