पेरियार रामास्वामी नायकर - Page 588

परिशिष्ट-४७
पेरियार रामास्वामी नायकर

पेरियार Ane ape रामास्वामी नायकर (१८७९-१९७४).--मद्रास अिलाख्यातील -हारोट गावी गर्भश्रीमंत ब्राह्मणेत्तर घराण्यात जन्म. अंधश्रद्धा, धार्मिक थोतांड, जातिभेद, अस्पृश्यता याबद्दल तीव्र नापसंती. स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र म्हणजे पातिव्रत्याचे लक्षण ही मुर्खपणाची वेडगळ कल्पना म्हणून स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकले होते. स्वातंत्र्य चळवळीत म. गांधीबरोबर भाग घेतला. अस्पृश्यांच्या हक्कासाठी वैकम सत्याग्रह केला. काँग्रेस ब्राह्मणधार्जिणी म्हणून काँग्रेसचा त्याग, द्रविड कझगम पक्षाची स्थापना. देव, धर्म, रूढी, परंपरा, पुराणे हया साऱ्या गोष्टी खालच्या लोकांना दडपण टाकण्यासाठी ब्राह्मणांनी निर्माण केल्या म्हणून तीव्र ब्राह्मण विरोधी. द्रविड संकृती आर्य संकृतीपेक्षा भिन्न म्हणून तामिळनाडूची वेगळी मागणी केली.

त्यांनी लिहिलेल्या ‘The Ramayan—A True Reading’ या प्रसिद्ध पुस्तकावर अनेकदा बंदी आणण्याचे प्रयत्न झाले.

त्यांचे खालील विचार त्याची क्रांतिकारकता प्रदर्शित करतात :--

“ «इंग्लंड मध्ये अतिशूद्र किंवा अस्पृश्य नाही, रशियात वर्णाश्रमधर्म किंवा दैववाद नाही. अमेरिकेत कुणी ब्रह्माच्या मुखातून तर कुणी त्याच्या पायातून जन्म पावत नाही. या देशातील लोक बुद्धीमान व शहाणे आहेत. ते स्वाभिमान विकत नाही. आपणच पाशवी देव धर्म फल्पनाचे बळी का व्हावे ? देव, धर्म जर आपल्या नाशाचे कारण असेल तर त्याला नष्ट करा. मनुस्मृती, गीता वा इतर कोणतेही पुराण आपल्या नाशाला कारणीभूत असतील तर त्यांनाही आग लावा, ते जर देवळे, सण असतील तर त्यांचा बहिष्कार करा. शेवटी, जर राजकारण त्यासाठी कारणीभूत असेल तर तसे स्पष्टपणे जाहीर करा.

*हिदू अडाणीपणा

*हिंदुला आपल्या धर्माबद्दल सविस्तर ज्ञान आहे का ? तो केव्हा आणि कुणी सुरू केला हे माहित आहे का ? आपण सारासार (Rational) विवेक करत असू तर आपणास हिंदुधर्माची गरज आहे का ?

*काही जण म्हणतात हिंदुधर्म हा वैदिक धर्म आहे. तसे असेल तर वेद कुठे आहेत? मी त्यांना पाहू शकतो का? मी ते वाचू शकतो का? तुम्ही म्हणत असाल की तुम्ही वेदांना स्पर्श नका वा पाहू नका तर तुम्ही ते जोरात वाचा म्हणजे मी