१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्यांची खरी दानत आहे. स्वराज्याच्या आरंभाचा जरी इतिहास घेतला तरी असेंच दिसून येईल, कीं, स्वराज्याचा मुळचा पाया ब्रिटिशलोकांनी केवळ तत्वप्रियतेमुळेंच घातला आहे. स्थानिक स्वराज्य, तसेंच प्राव्हिशिअल व सुप्रीम काउन्सिल यांची सुरवात करण्यास प्रजेतफे कोणी वकील गेला होता हे निदान इतिहासनमूद तरी नाहीं. आगि हल्लींचें स्वराज्य आजच जन्मास आलें नसून ह्याची पांचवी झाल्यास आज साठ वर्षे झाली आहेत ; म्हणूनच हें गोजीरवाणे रांगतें बाळ कोणीहि कडेवर घेतलें तरी त्याचे मातापित्ता ब्रिटिशलोक आहेत हें मात्र कोणी विसरू नये.
विविध विचार : मूकनायक, शनिवार ता. १४ फेब्रुवारी १९२०