व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 595

व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५४७

काणे, पांडुरंग वामन (१८८०-१९७२) :--संस्कृत भाषेतील महापंडित. धर्मशास्त्राचा इतिहास इंग्रजी भाषेत तीन खंडात लिहिला व मोठी कीर्ती संपादन केली. सरकारने त्यांना 'महामहोपाध्याय' या पदवीने गौरविले. संस्कृत पंडित म्हणून जगातील विद्वानात ख्याती.

कुळकर्णी लीलामृत :--'दीनमित्र' कार मुकुंदराव गणपतराव पाटील यांनी खेडे गावातील शहेनहशहा सुलतान ब्राह्मण कुळकर्णी याच्या गुलामगिरीतून गांवच्या बहुजन समाजाची मुक्तता व्हावी व त्यासाठी प्रचार व्हावा, म्हणून 'कुळकर्णी-लीलामृत' हे ओवीबद्ध पुस्तक १९१३ साली लिहिले. ते विठ्ठल पिराजी डोणे यांनी पुस्तकरूपाने फिरून प्रसिद्ध केले. रा. भास्करराव जाधव यांनी त्यास प्रस्तावना लिहिली.

कोल्हटकर, अच्युत बळवंत :-(१८७९-१९३१) अर्वाचीन मराठी भाषेतील ललित, सुलभ व विविध प्रकारच्या लेखनशैलीचे आद्य प्रवर्तक. एक लोकप्रिय वृत्तपत्रकार. वृत्तपत्रचालविणे हाच अखेरपर्यंत व्यवसाय. विविध नावांची

आठ वृत्तपत्रे चालवून शेवटी संदेशकार म्हणूनच प्रसिद्ध. चुलते बळवंतराव

यांनी पालण पोषण केले म्हणून स्वत: अच्चुत बळवंत म्हणवीत. वडिलांचे नाव वामनराव. आपली आग्रही मते आकर्षक व सुबोध लिखाणाने बहुजनसमाजाच्या अगदी खालच्या थरापर्यंत नेऊन भिडवीत. लालित्यपूर्ण लिखाण असले तरी त्यात उपरोध, उपहास व विरोध यांचा विलक्षण रीतीने समन्वय करणे हे त्यांचे लेखनवैशिष्ट्य. वृत्तीने सडेतोड म्हणून सुरुवातीस जहाल टिळकभक्त असूनही केसरीशी मतभेद झाल्याने खुद्द टिळकांवरही घसरण्यास कमी [केले ] नाही. “लो. टिळक बाळंतीण झाले' हा त्यातलाच प्रकार. परिणामी ते अप्रिय

झाले. |

खर्ड्याची लढाई :--ता. १७ मार्च १७९५ रोजी नानासाहेब फडणीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठे सरदार एकत्र येऊन निजामाशी खर्डे येथे मोठी लढाई होऊन त्यात मराठ्यांचा जय झाला. नाना फडणीसांच्या कारस्थानाचा तो परमोच्च बिंदु व हिंदुस्थानच्या इतिहासातील एक संस्मरणीय टप्पा होय. मराठ्यांचे सर्व गुण, तसेच हिंदूंचे सर्व अवगुण या युद्धात दृष्टीस पडतात. खर्डे हे गाव जामखेड तालुक्याच्या अगदी पश्‍चिम सीमेवर असून लढाईला खड्थाचे नाव मिळाले असले तरी युद्धातील मुख्य चकमक खर्ड्याच्या नेऋत्येस खर नदीपलीकडे असलेल्या सात मैलांवरील एका टेकडावर झाली. ही टेकडी आता रणटेकडी या नावाने प्रख्यात आहे.