डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५४८
गाडगीळ, नरहर विष्णु :--(१८९६-१९६६) पुढारी, मंत्री व लेखक. जन्म राजपुतान्यात मल्हारगड येथे, शिक्षण नीमच, मुंबई, बडोदे व पुणे येथे. काही
कमिटीचे काळ वकिली, त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत भाग. पुणे जिल्हा काँग्रेस कार्यवाह, नंतर महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात समावेश. पुढे पंजाबचे राज्यपाल. मराठी व हिंदी भाषेतून विविध पुस्तके लिहिली. हिदी अंदाजपत्रके, ग्यानबाचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्रविचार, कायदेमंडळातील सहा वर्षे, अनगड मोती, स्मृतिशेष, कांही मोहरा काही मोती ही काही पुस्तके. पुणे पर्वती सत्याग्रहात
अस्पृश्यांबरोबर सहभाग.
` खान-मालिनी विवाह :--प्रसिद्ध गाढे संस्कृत पंडित, प्राच्याविद्याविशारद व पुराणवस्तुसंशोधक डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ज्येष्ठ कन्या शांताबाई यांची मुलगी कु. मालिनीबाई पाणंदीकर, बी. ए., बी. टी. या सारस्वत हिंदू मुलीचा विवाह गुलाबखान बशिरुद्दीनखान, बी. ए., बी. टी. या मुसलमान गृहस्थाशी नोंदणी पद्धतीने पुण्यास २४ जून १९२७ रोजी झाला. ह्या विवाहास एक साक्षीदार म्हणून ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या जर्मन पत्नी शीलवतीबाई केतकर ह्या उपस्थित होत्या. एक सुशिक्षित ब्राह्मण मुलगी एका मुसलमान युवकाशी आंतरधर्मीय विवाह करणार असल्याची अत्यंत
खळबळजनक माहिती सर्वप्रथम डॉ. केतकरांनी ' पुणे समाचार ' ह्या आपल्या
दैनिकाच्या १ जून १९२७ च्या पहिल्याच अंकात प्रसिद्ध केली होती. ही प्रक्षोभक वार्ता आदल्या संध्याकाळी त्यावेळचे वार्ताहर श्री. रा. टिकेकर यांनी डॉ. केतकरांना आणून दिली होती. ' पुणे समाचारा 'त मात्र वधुवरांच्या नावाचा उल्लेख केला
नव्हता. ह्या विवाहावर खूप टीका झाली. अच्युत बळवंत कोल्हटकारांनी आपल्या ' चाबुकस्वारा ‘aA मालिनीचे नाव सुरुवातीस दडवून ठेवल्याबद्दल
डॉ. केतकरांची "लांडा कोल्हा' वगैरे म्हणून खूप संभावना केली. सनातन्यांच्या टीका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा 'बहिष्कृत भारताच्या' १२ ऑगस्ट १९२७ च्या अंकात ' ढोंगीपणा, माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा ' ह्या नावाचा अग्रलेख ह्या संदर्भात लिहिला. पहा,लेख क्रमांक ५७, पु. २३७.
खिलाफत :- पहिल्या महायुद्धाच्या वेळी तुर्कस्थान जर्मनीच्या बाजूने ब्रिटीश साम्राज्याशी लढत होते. हिंदुस्थानातील मुसलमान लोकांना यावेळी ब्रिटीश साम्राज्याच्या बाजूने तुर्कस्थानाविरुद्ध लढण्याचा प्रसंग आला. यावेळी आम्ही हे युद्ध तुर्कस्थानचे आशियातील साम्राज्य हिरावून घेण्यासाठी करीत नाही आणि मुसलमानांच्या धर्मक्षेत्रावरील खलिफाची म्हणजे तुर्की सुलतानाची सत्ता