व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५४९
नष्ट करणार नाही. अशी आश्वासने ब्रिटीश मुत्सद्यांनी दिलेली होती. ही आश्वासने खरी करावयाची तर मेसोपोटेमिया, अरबस्तान, सीरीया, पॅलेस्टाईन या सर्वांवर असलेली खलिफाची धर्मसत्ता व राजसत्ता यांना धक्का लावता आला नसता. पण महायुद्धानंतर ब्रिटीश व फ्रेंच मुत्सद्यांनी पॅलेस्टाईन, सीरिया, मेसोपोटेमिया, अरबस्तान वगैरे सर्व देशातील तुर्कस्थानचे साम्राज्य नष्ट केले व अशा रीतीने ब्रिटिशांनी हिंदी मुसलमानांचा विश्वासघात केला होता, त्यांच्या धर्मभावनांवर आघात केला होता. त्यामुळे भारतात ब्रिटिशांविरुद्ध मुसलमानांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात.
मुसलमानांच्या खिलापतीवरील इंग्रजांचा अन्याय दूर करण्यासाठी १ ऑगस्ट १९२० पासून म. गांधींनी असहकारितेची चळवळ आरंभ केली होती.
गोखले, गोपाळ कृष्ण :--( १८६६-१९१५ ) हिंदुस्थानचे सुप्रसिद्ध राजकारणी पुढारी, इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध वक्ते व सर्व्हटस् ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेचे संस्थापक. जन्म चिपळूण तालुक्यातील ताम्हणूमळा येथे. कोल्हापूर व मुंबई येथे शिक्षण. १९०२ पर्यंत डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचे आजीव सभासद व फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित, इंग्रजी, अर्थशास्त्र व इतिहास या विषयाचे प्राध्यापक. १८८७ मध्ये पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस, १८८८ मध्ये 'सुधारक' या इंग्रजी-मराठी साप्ताहिकाचे संपादक. १८९५ साली पुणे येथे भरलेल्या राष्ट्रसभेचे हे स्थानिक चिटणीस होते व १९०४ साली राष्ट्रसभेचे जोड-चिटणीस होते. १८९७ साली हे पुण्याच्या डेक्कन सभेचे प्रतिनिधी म्हणून हिंदुस्थानच्या जमाखर्चाची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या वेल्बी कमिशनपुढे साक्ष देण्यासाठी इंग्लंडला गेले. १९०० मध्ये मुंबई प्रांतिक कौन्सिलमध्ये. १९०२ पासून पुढे अखेरपर्यंत वरिष्ठ कायदेमंडळात. १९०४ मध्ये ब्रिटिश सरकारने सी. आर. ई. ही पदवी देऊन गौरव केला. आदर्श शिस्तीला धरून वागणारे नेमस्त म्हणूनच यांची ख्याती. यांचे सार्वजनिक जीवन froma व त्यागपूर्ण होते. हे
न्या. रानडे यांना गुरू मानीत.
घोरपडे, वा. न. उपाख्य दादासाहेब :--डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील एक समर्पित व्यक्ती होते. १९३२ मध्ये पूना पॅक्ट झाला त्यावेळी वामनराव घोरपडे हे तेथील हायस्कूलवर हेडमास्तर होते. पुढे ते विदर्भातील वर्धा येथे वास्तवास आले. ते १९५७ मध्ये वर्धा येथून लोकसभेसाठी उभे होते. सामाजिक उत्थानासाठी सतत कार्यशील राहिले. वर्धा जिल्हापरिषदेचे मुखपत्र "विकास वार्ता' याचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी कार्य केले. विकास