व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 598

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५५०

लेख विशेषतः वार्ता या मासिकातून त्यांनी अनेक विचार प्रवर्तक लिहिले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसंबंधी त्यांनी शेकडो भाषणे दिली. ते उत्कृष्ट वक्ते होते. तसेच तळमळीचे कार्यकर्ते होते. जीवनाच्या शेवट पर्यंत त्यांनी म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या

विचारांचा प्रचार व प्रसार केला.

१९५४ ला भंडारा येथील लोकसभेच्या पोट निवडणूकीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे होते. पुलगांवला सभेसाठी डॉ. बाबासाहेब वर्धा येथे आले

असतांना त्यांनी वामनराव घोरपडेंना भेटण्याची इच्छा व्यक्‍त केली. श्री.

वामनरावांना डॉ. बाबा साहेबांचा निरोप मिळताच त्यांना भेटावयास गेले. ही

भेट मोठीच अविस्मरणीय होती. हा घडलेला भेटीचा प्रसंग श्री वामनराव घोरपडेंनी आपल्या स्मृति मंजुषेत जीवनभर जपून ठेवला होता. या भेटीमुळे

त्यांना मोठे कृतार्थ वाटत होते.

चित्तरंजन दास, देशबंधु :--( १८७०-१९२५) बंगालमधील सुप्रसिद्ध वकील, कवी, वर्तमानपत्रकार व राजकारणी पुढारी. जन्म कलकत्ता येथे वैद्य नावाच्या ज्ञातीत झाला. कलकत्ता येथे शिक्षण घेऊन (१८९०) आय. सी. एस. साठी इंग्लडला रवाना आणि बॅरिस्टर होऊन परत आले (१८९२). तेथील वास्तव्यात दादाभाई नौरोजी यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समधील उमेदवारीस पाठिंबा देण्याकरिता यांनी अनेक राजकीय व्याख्याने दिली. परत आल्यावर कलकत्ता येथे वकिली. हे राजकारणी म्हणून हिंदुस्थानात विख्यात असले तरी बंगाली भाषेत, बंगाली भाषेतील उत्कृष्ट कवी म्हणूनच लोक यांना विशेष ओळखतात. यांचे ' सागर संगीत ' हे काव्य फारच प्रसिद्ध होते. ' नारायण ' नावाचे बंगाली मासिक किती तरी वर्ष यांनी सतत चालविले. त्यात साहित्य व वैष्णव यासंबंधी विशेष चर्चा असे. यामुळेच १९१५ साली बंगाली साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद यांना देण्यात आले. १९०६ साली सुरू झालेल्या ‘de मातरम्‌ “ या इंग्रजी पत्राचे एक संस्थापक व संपादक मंडळापैकी एक. ' वंदे मातरम्‌ 'चे संपादक बाबू अरविंद घोष यांच्यावरील राजद्रोहाच्या खटल्यात यांच्या वकिली कौशल्याचा प्रत्यय प्रथम आला. माणिकतोळा बाग कटाच्या खटल्यात तर राष्ट्रीय वकील म्हणून भारतभर प्रसिद्धी. हे प्रथम १९०६ साली राष्ट्रसभेत आले. असहकारितेच्या जाहीरनाम्याप्रमाणे आपल्या मोठ्या प्राप्तीच्या वकिलीचा त्याग केला आणि आपली सर्व संपत्ती मेडिकल कॉलेज व स्त्रियांचा दवाखाना याकरिता देऊन टाकली. याच वेळी लोक यांना ' देशबंधु ' या गौरवदर्शक नावाने संबोधू लागले. डाक्का येथे ' राष्ट्रीय विद्यापीठा “ची

स्थापना.