व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 599

व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५५१

चित्रे, अनंतराव विनायक :--जातीने कायस्थ प्रभु महाड सत्याग्रह परिषदेची सारी जबाबदारी त्यांच्यावरचं सोपविली गेली होती. महाडच्या ` पहिल्या परिषदेत दिनांक २० मार्च १९२७ ला चवदार तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा ठराव त्यांनीच मांडला होता.

चिपळूणकर, विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री (१८५०-१८८२) :--मराठी भाषेचे शिवाजी म्हणून प्रसिद्ध. जाज्वल्य हिंदुनिष्ठ, हिंदू संस्कृती, स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म याचे कट्टर अभिमानी. हिंदी लोकांचा ओढा पाश्चात्य लोकांच्या अंधानुकरणाकडे लागलेला पाहून त्यांना परावृत्त करण्यासाठी निबंधमालेची स्थापना. त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल, चित्रशाळा व किताबखाना यांची स्थापना. टिळक, आगरकर व इतरांच्या सहकार्याने केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरू केली. सामाजिक सुधारणाबाबतीत प्रतिगामी धोरण. त्यामुळे लोकहितवादीवर सडकून टीका.

चैतन्य :--सन १४८६ मध्ये या महात्म्याचा जन्म झाला. याने बंगाल व ओरिसा या प्रांतामध्ये वैष्णवमताचा प्रसार केला. जगन्नाथाच्या पुढे सर्व लोक सारखे आहेत असे याचे मत होते. याच्या समतेच्या उदार वैष्णवमतापुढे याला सर्व लोक विष्णूचा अवतारच मानीत असत. हिंदूतील सर्व जातीचे व मुसलमानी धर्माचे लोकही याचे शिष्य झालेले होते. मनुष्य कोणत्याही जातीत उत्पन्न झालेला असला तरी हरकत नाही. परमेश्वर भक्तीने त्यांची - सर्वांची - सारखीच शुद्धी होते. परमेश्‍वराजवळ जातिभेद नाही व स्पर्शास्पर्शभेदहि नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते.

जवळकर, दिनकरराव शंकरराव ( १८९८-१९३२ ) :--ब्राह्मणेतर पुढारी, सत्यशोधक समाजाचे कट्टर पुरस्कर्ते. मेँट्रिकपर्यत शिक्षण. त्यांनी कोल्हापूरला “ तरुण मराठा ' हे पत्र चालविले, पत्राची भाषा सडेतोड, तिखट व भडक असे, ब्राह्मण हे लक्ष्य असे. तथापि, बहुजन समाजातील ब्राह्मणधाजिण्या व प्रतिगामी लोकांवरही त्यांची लेखणी तुटून पडे. पुण्याच्या ' विजयी मराठ्या “त ' भवानी तलवार ' या टोपण नावाने ' तलवारीचे वार ' सनातन्यांवर करीत. त्यांच्या ' देशाचे दुष्मन ' ह्या पुस्तकाने खूप खळबळ माजविली होती. बाबासाहेब आंबेडकरांची ह्या पुस्तकावर अशी प्रतिक्रिया होती की, ' It is a good book

written in a bad taste. '

जाधव, एम. के. :--संस्कृत घेऊन बी. ए. ऑनर्सची पदवी धारण करणारे पहिले महार तरूण. पदवीदान सभारंभासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपला वकिलीचा काळा झगा त्यांना दिला होता. त्यांना बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळेच