६
बुजतील म्हणून !
गेल्या महिन्याच्या २० तारखेच्या केसरीच्या अंकांत मुंबईत न्याशनल डेमॉक्रॉटिक कंपनीच्या तर्फे प्रसिद्ध होणाऱ्या डेमोक्राट पत्राची जाहिरात दिली आहे. जेवून ढेंकर दिल्यावर यजमानास आशीर्वाद देणें हें जसें अतिथींचें कर्तव्य असतें त्याच न्यायानें केसरी पत्राने आपल्या स्फूट सूचनेत या कंपनीला शेअर्सच्या रूपानें साहाय्य करण्यास राष्ट्रीय पक्षाच्या लोकांस तसेंच आपल्या वर्गणीदारांस शिफारस केली आहे, ह्यांत कांही वावगे नाही. उलट एवढ्या मोठ्या जाहिरातीचे पैसे खाऊन त्यासंबधानें कांहीं उद्गार काढले नसते तर मात्र केसरीची वर्तणूक निंदास्पद झाली असती. “ब्रिटिश साम्राज्यांतर्गत पूर्ण स्वराज्य आणि सर्व बाबतींत ब्रिटिश वसाहतींच्या बरोबरीचे हक्क संपादन करण्याकरिता झटणें तसेंच अंतर्गत व्यवस्थेत समतेच्या तत्त्वावर अखिल हिंदी प्रजेच्या हितासाठी जात, वर्ग, व लिंगाचा पक्षपात न करितां झटणें “ हे या पत्राचे उद्देश आहेत असें तें प्रसिद्ध करणाऱ्या कंपनीच्या उद्देशपत्रिकेंत म्हटलें आहे. " बोले तैसा चाले “ न्यायानें आपले उद्देश निःपक्षपातानें सदोदित मूर्तस्वरूपांत आणण्याचा या पत्रानें प्रयत्न केला तर तें लोकादराला पात्र होईल यांत शंका नाहीं. परंतु कंपनीच्या डायरेक्टरांच्या यादीकडे लक्ष्य पुरविले असतां हें पत्र बोलल्याप्रमाणें वागेल असें. संभवत नाहीं. कारण कांहीं डायरेक्टरांना साम्राज्यांतर्गत पूर्ण स्वराज्य पाहिजे, परंतु अन्तर्गत व्यवस्थेत स्वयंनिर्णयाचें तत्त्व लावण्यास ते कबूल होतील असें त्यांच्या आजपर्यंतच्या आचाराविचारावरून तरी वाटत नाहीं. तरीपण बारा कोसांवर जमिनीला आकाश टेकलें असें दाखवून आपला हितसंबंध एकच आहे असें भासवून बहुजनसमाजाची फसगत करणाऱया या लोकांच्या शीलांत काय
फरक पडतो हें अनुभवच सांगू शकेल. तरी या भावी डेमोक्राट पत्राचे उद्देश
सांगतांना SRA जो लपंडाव केला आहे तो चवाठ्यावर आणण्यासारखा आहे. ब्रिटिश साम्राज्यांतर्गत पूर्ण स्वराज्य आणि सर्व बाबतींत ब्रिटिश वसाहतींच्या बरोबरचे पूर्ण हक्क संपादन करणें हा या पत्राचा उद्देश आहे. ' म्हणून राष्ट्रीयपक्षाच्या लोकांस आणि तसेंच आपल्या वर्गणीदारांस या पत्रास साहाय्य करण्याकरिता केसरीनें विनंति केली आहे. अंतर्व्यवस्थेत समतेचे तत्व लागू करणें हा जो या पत्राचा दुसरा महत्त्वाचा व तसाच स्तुत्य उद्देश आहे तो केसरीने कां गुलदस्तांत ठेवला याचें नवल वाटतें. एकतर स्वतःस तो उद्देश पसंत
डब्ल्यू-२०७३-२ अ