व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५५३
१९१९-१९३० च्या राजकीय चळवळीत ब्राह्मणेतर पक्ष जनतेपुढे आला व विसर्जन पावला. त्या पक्षाचे पुढारीपण काही काळ भास्कररावांनी केले. १९२३-२९ च्या काळात ते मुंबई सरकारचे मंत्री झाले होते. ते प्रथम मंत्री झाले तेव्हा ब्राह्मणेतर पक्षाबद्दल द्वेष बाळगणाऱ्या वृत्तपत्रांनी व लोकांनी भास्कररावांवर टीकेचा, उपहासाचा व कुचेष्टांचा नुसता वर्षाव केला.
भास्करराव १९३० च्या निवडणुकीत मध्यवर्ती विधिमंडळात निवडून आले. पण १९३७ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले.
भास्कररावांच्या स्वार्थी पुढारीपणामुळे ब्राह्मणेत्तर पक्षाचा ऱ्हास झाला व त्यातील बहुजन समाज १९३० साली काँग्रेसमध्ये सामील झाला, असा एक त्यांच्यावर लोकापवाद आहे व तो अनेक लेखक आणि वक्ते यांनी केलेला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे बहुजन समाजात विशेष नेत्रदीपक कार्य झाले नसले तरी सर्वसाधारण जागृतीची बीजे बहुजन समाजात त्यांच्याच काळात पेरली गेली हे कोणताही समंजस माणूस मान्य करील.
अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भास्कररावांनी कोल्हापूरात अगर मुंबई इलाख्यात स्वतंत्रपणे असे कार्य केलेले नाही. उलट काही अंशी त्यांचा अस्पृश्यांपेक्षा मराठ्यांकडे फार ओढा होता असे १९२६-२९ च्या काळात अस्पृश्यांतील समाजसेवक सभेतून व खाजगीत बोलत असत.
भास्करराव २६-६-१९५० रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी कोल्हापूर येथे दिवंगत झाले. (रामायणावर नवा प्रकाश, जीवनवृत्त, पा. ७-७२)”
जेधे, केशवराव मारूतीराव (१८९६-१९५९) :--सुरुवातीच्या कारकीर्दीत ब्राह्मणेतर पक्षात असलेले सत्यशोधक समाजाचे कट्टर पुरस्कर्ते, पुढे काँग्रेसचे पुढारी. १९२३ मध्ये 'तरुण मराठा पक्षा' ची स्थापना व 'शिवस्मारक' साप्ताहिकाची सुरुवात. १९२४ मध्ये 'मजूर ' नावाच्या दैनिकाची सुरुवात. दिनकरराव जवळकरांच्या सोबतीने मुंबईत “कैवारी ' नावाच्या साप्ताहिकाची सुरुवात. पुढे दोघात वितुष्ट. मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे प्रवर्तक. १९३३ मध्ये हरिजन सेवक संघाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष. १९३५ मध्ये काँग्रेसतफे मध्यवर्ती असेंब्लीत निवड. काही काळ महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. पुढे काँग्रेस सोडून बहुजनपक्षाची स्थापना व शेतकरी, कामकरी लोकांची संघटना.
१: खैरमोडे, खंड ५ वा, प. २७५-२७६.