व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 602

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५५४

जोशी, विनायक चिंतामण :--सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक व विनोदी लेखक, चिमणराव व गुंड्याभाऊ हे त्यांचे दोन विनोदी मानसपुत्र. विनोदी साहित्याचे दालन श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनंतर समृद्ध करणारे जोशी, पाली भाषेचे बडोदे महाविद्यालयात प्राध्यापक होते. ' जातकातील निवडक गोष्टी ', 'बुद्ध, संप्रदाय व शिकवण ' वगैरे बौद्धधर्मावरील ग्रंथही त्यांनी लिहिले.

जोशी, पुरूषोत्तम प्रभाकर :--महाडचे रहिवासी, लो. टिळकांचे निःसीम भक्त, व्यायामाचे शौकीन त्यामुळे महाड येथे लो. टिळकाच्या नावे तालीमखान्याची

सुरवात, हिंदुसभेचे निष्ठावान कार्यकर्त,

टिपणीस, सुरेन्द्रनाथ गोंविंद (१८९८-१९७८) :--नानासाहेब टिपणीस म्हणून प्रसिद्ध, साक्रेटिसाचे चरित्र, कौटिलीय अर्थशास्त्राचे पहिले मराठी भाषांतर इत्यादी ग्रंथांचे कर्ते व केवळ मॅट्रिक असून एलफिन्स्टन कॉलेजात मराठीचे पहिले प्राध्यापक झालेले गोविंद गोपाळ टिपणीस यांचे हे पुत्र. सुरेन्द्रनाथ टिपणीस महाड म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष असता चवदार तळे

अस्पृश्यासाठी मुक्त केले गेले होते. बाबासाहेबांशी घनिष्ट संबंध, पिपल एज्युकेशन सोसायटीचे काही वर्षे उपाध्यक्ष.

टिळक, लो. बाळ गंगाधर (१८५६-१९२०) :--स्वराज्याच्या चळवळीचे अध्वर्यु. त्यामुळे 'भारतीय असंतोषाचे जनक ' म्हणून इंग्रजांनी लावलेले दूषण हेच भूषण ठरले. धुरंधर राजकीय नेते म्हणून जसे प्रसिद्ध तसेच झुंझार पत्रकार, उत्कृष्ट निबंधकार, व्यासंगी ग्रंथकार व विद्धान संशोधक म्हणून प्रसिद्धी. केसरी, मराठा ही वृत्तपत्रे काढली. गीतारहस्य, आर्याचे मूळे निवासस्थान, वगैरे ग्रंथांची निर्मिती. 'आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा ' या वादातील 'आधी राजकीय सुधारणा ' या मताचे प्रखर पुरस्कर्ते म्हणून सामाजिक सुधारकांशी बरेचदा विरोध.

डिप्रेस्ड इंडिया असोसिएशन :--साऊथबरो कमिशनपुढे नागपूर येथे ११ डिसेंबर १९१८ रोजी श्री. ग. आ. गवई यांची जी साक्ष झाली, त्याच्या छापील वृत्तांतात 'डिप्रेस्ड इंडिया असोसिएशन ' बद्दल पुढील माहिती आढळते . . . “ He (Gavai) was the secretary of the Depressed India Association which had been started to safeguard the interest of the depressed classes with head quarters at Amravati. It contained 500 members from Berar, the Central Provinces and the Bombay Presidency. There wasamember’s subscription of 8 Anna, a year